शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:13 IST

गेल्या अनेक वर्षापासून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला नाही. शहराची वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता भंडारा शहराचा सर्वकष आराखडा तयार करणे आवश्यक असून नगर पालिकेने पुढील ३० वर्षाचा डोळयासमोर ठेवून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : नगर पालिका कामाचा आढावा, दूषित पाणी असलेल्या प्रभागात ‘आरो प्लांट’चा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गेल्या अनेक वर्षापासून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला नाही. शहराची वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता भंडारा शहराचा सर्वकष आराखडा तयार करणे आवश्यक असून नगर पालिकेने पुढील ३० वर्षाचा डोळयासमोर ठेवून भंडारा शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.नगर पालिकेच्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडाळे, उपनगराध्यक्ष आशु गोंडाणे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नगरसेवक व विभाग प्रमुख उपस्थित होते.भंडारा शहरासाठी शासनाने ५६ कोटी रुपये किंमतीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. ही योजना पूर्णत्वास येण्यास दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत भंडारा शहरवासियांना पुरेसे पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी नगर परिषदेने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.प्रत्येक प्रभागात एक आरो प्लांट बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून चर्चा करावी, असे ते म्हणाले. दिवाळीच्या आत किमान २० आरो प्लाँट बसविण्याचे नियोजन करावे. नगरपालिकेच्या विविध विभागाचा अखर्चित निधी ५२ कोटी रुपयांच्या जवळपास असून अखर्चित निधीची माहिती कारणासह सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नगर पालिकेची बैठक दर महिन्याला घेवून लेखा विभागाने अखर्चित निधी विकास कामाबाबत नगरसेवकांनी माहिती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विकास कामांचे नियोजन करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात यावेत, असे ते म्हणाले. विकास कामाचे जिओ टॅगिग, छायाचित्र व चित्रिकरण अनिवार्य असून या बाबतची माहिती वेळोवेळी नगरपरिषद सदस्यांना देण्याची सूचना त्यांनी केली.जिल्हा नियोजनचा निधी दिवाळी पूर्वी खर्च करण्यात यावा अन्यथा निधी परत घेवू असेही पालकमंत्री यांनी सांगितले. नगर परिषदेचा निधी वेळेत खर्च होणे आवश्यक असून जो विभाग निधी परत करेल त्या विभागाच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले. पहिले निधी खर्च करा व नंतरच निधी मिळवा, असे ते म्हणाले.नगर पालिकेच्या बजेटची एक प्रत नगर सेवकांना देण्यात यावी असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, शहरातील गरजू व्यक्तींना घरकूल देण्याबाबत प्रधानमंत्री आवास योजना प्राधान्याने राबविण्यात यावी. यासाठी नगर पालिकेने म्हाडाला प्रस्ताव पाठवावा, असे त्यांनी सांगितले. घरकूल योजनेसाठी लागणाºया आवश्यक परवानग्या घेतांनाच जागेचा अभाव असल्यास बहुमजली इमारतीचा आराखडा तयार करावा. नगर पालिकेच्या विकास कामाचे आराखडे तपासण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्तरीय अधिकारी व नगर रचनाकार यांची नियुक्ती करावी, असे त्यांनी सूचविले.दलित वस्ती योजनेत सिमेंट रस्ते न घेता मुलभूत सुविधेची कामे करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांच्या तक्रारी असून कचरा व्यवस्थापन योग्य रितीने करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.