शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘बीटीबी’तर्फे खासदारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:47 IST

येथील ‘बीटीबी’ भाजीमंडी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने भंडारा-गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांचा मंगळवारी एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला. लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे ग्वाही सत्काराला उत्तर देताना खासदार मेंढे यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आयोजन : सर्वांगीण विकासाची दिली ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील ‘बीटीबी’ भाजीमंडी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने भंडारा-गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांचा मंगळवारी एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला. लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे ग्वाही सत्काराला उत्तर देताना खासदार मेंढे यांनी दिली.भंडारा-गोंदिया जिल्हा धानाचा, वनाचा आणि तलावाचा आहे. यात सकारात्मक बदल घडवून शेतकºयांना अधिकाधिक फायदा कसा होईल, यासाठी खासदारांनी उपस्थित शेतकºयांशी संवाद साधला. जिल्हा वर्षभर पाणीदार राहावा. नदीजोड प्रकल्पाला न्याय मिळावा. गोसे प्रकल्पाचा कालव्याचे विस्तारीकरण करावे, धान व इतर पिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आदी मागण्या यावेळी शेतकºयांनी खासदाराजवळ केल्या. बीटीबीच्या माध्यमातून भाजीपाल्यात समृध्दी आली आहे.दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन येतात, अशा पध्दतीने विकासात्मक कामावर भर देणार असल्याचे खासदार मेंढे म्हणाले. पिण्याचे पाणी, घरकुल, सिंचन, उद्योग आदींना आपण प्राधान्य देवून सर्वंकष विकासासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.यावेळी खासदार सुनील मेंढे, शुभांगी मेंढे या दाम्पत्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्यावतीने हा सत्कार करण्यात आला.यावेळी बीटीबीच्या सचिव पौर्णिमा बारापात्रे, सुधीर धकाते यांच्यासह तुळशीराम देशकर, प्रकाश मस्के, कैलाश मेहर, ताराचंद गायधने, नाजुक गायधने, डॉ. संजय एकापुरे, प्राध्यापक हेमंत देशमुख, प्रदीप दिवे, लक्ष्मीण सिंगोरे, राहुल कडव, प्रशांत सागर, घनश्याम भेदे, विजय हटवार, शंकर गायधने उपस्थित होते. संचालन राकेश हुकरे यांनी तर आभार प्रदीप दिवे यांनी मानले. या सोहळ्याला सब्जीमंडीचे व्यापारी, हमाल, कर्मचारी उपस्थित होते.