शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

भाऊ... कोणाचा माणूस बसला गा !

By admin | Updated: July 16, 2015 00:52 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्याने सर्वच पक्षाचे पाठिराखे ..

प्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्याने सर्वच पक्षाचे पाठिराखे जिल्हा परिषद परिसरात बुधवारला सकाळपासूनच गर्दी करु लागले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल गुलदस्त्यात होता. दरम्यान, उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये खलबत्ते सुरू असल्याने कार्यकर्ते एकमेकांना उत्कंठेने विचारताना दिसत होते, भाऊ... काय झालं? कोणाचा माणुस बसला गा? शेवटी निकाल बाहेर आला आणि ही शिगेला पोहोचलेली उत्कंठा संपली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या धीरगंभीर चेहऱ्यांवर हास्य फुलून ढोलताशांचा गजर, गुलाल उधडणे व फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.बुधवारला भंडारा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. या निवडणुकीकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या होत्या. काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता बसेल असे वाटत होते. मात्र, गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप व काँग्रेसने हातमिळवणी करून राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवले. त्यामुळे बुधवारला भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या होत्या. किंबहुना सर्वच पक्षाचे पाठिराखे सकाळपासूनच जिल्हा परिषद परिसरात गर्दी केली होती. दुपारी ४ वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे काय झाले हे कोणालाच कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दुपारपर्यंत खलबत्ते सुरू होते.गोंदिया जिल्हा परिषदेतील निकालानंतर राजकीय पक्षाचे वातावरण ढवळून निघाले होते. गोंदियाची पुनरावृत्ती भंडारा येथे होईल, यावर अनेकांनी शर्यती लावल्या होत्या. दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना दोन दिवसापूर्वी देवदर्शनासाठी पाठविले. सर्वच उमेदवार बुधवारला सकाळी १२ वाजताच्या सुमारास वाहनांमधून जिल्हा परिषदमध्ये दाखल झाले. राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी ओळखून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कर्मचारी वगळता कुणीच आत जावू शकत नव्हता. चोख पोलीस बंदोबस्तामुळे कार्यकर्त्यांना परिसरातील छोट्या हॉटेल व झाडांच्या आश्रयाने निकालाची वाट बघावी लागली होती. सभागृहात काय चालले हे कोणालाच कळत नव्हते. त्यामुळे एखाद्या पक्षात वरिष्ठ जबाबदारी सांभाळणाऱ्यांच्या सभोवती सामान्यांचा गराडा दिसून येत होता. त्यांचा फोन वाजला किंवा ते फोनवर बोलत असले तरी, बाजुचे नागरिक व सामान्य कार्यकर्ता त्यांना उत्कंठेने भाऊ काय झाल? म्हणून विचारताना दिसत होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत निवडणूक परिसरात असाच प्रकार बघायला मिळाला होता. याठिकाणी पक्षाचा छोटा कार्यकर्ता असता तरी तो, पांढरा पेहराव व खांद्यावर दुप्पटा अशा वेशभुषेत बघायला मिळाला. सभागृहातील निकालाची सर्वांनाच उत्कंठा लागली असल्याने या परिसरात असलेल्यांचे फोन वरचेवर खणखणत होते. सर्वांनाच कोणता पक्ष सत्तेत येणार व कोण अध्यक्ष व उपाध्यक्ष बनेल याकडे लक्ष लागले होते. दरम्यान, सभागृहाबाहेर एखादा सदस्य बाहेरही दिसला तरी, त्यालाही भाऊ... काय झाल? कोणाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष झाला? असे विचारणे सुरू होते. घड्याळाचे काटे जस जसे पुढे सरकत होते. तसतसे निकाल ऐकण्यासाठी अनेकांच्या चेहऱ्यावर उत्कंठा व चेहरे धीरगंभीर बनत चालले होते. आणि कार्यकर्त्यांची दिवसभराची उत्कंठा तेव्हा भांड्यात पडली, जेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचा विजय झाला याची गोड बातमी बाहेर आली. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले. तर दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे चेहरे हिरमुसले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ ने व काँग्रेसच्या ‘पंजा’ ने या निवडणुकीत करामत केल्यागत विजय झाला. या विजयी वार्तेने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हातात झेंडा घेऊन नारे देत होते. यावेळी गुलालाची उधळण करून वाद्याच्या तालावर सर्वच बेधुंद होऊन थिरकताना दिसले. या विजयाने दोन्ही पक्षाला बसलेली मरगळ दूर सारण्यासाठी संधी आली असून यामुळे एकप्रकारे पक्षाला नवसंजिवनी मिळाल्याची प्रचिती सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.