शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरच्या जगप्रसिद्ध मँगनीज खाण क्षेत्र विस्तारीकरणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 13:49 IST

तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला ब्रेक लागला असून, गत ११९ वर्षांत या खाणींचे क्षेत्र वाढविण्यात आले नाही.

ठळक मुद्देखाण परिसरातील गावांत मूलभूत सोयी सुविधांचा अभाव

मोहन भोयर

भंडारा : तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मँगनीज खाणीच्या विस्तारीकरणाला जंगल व्याप्त परिसर आणि शेजारी असलेल्या गावांचा मोठा फटका बसत आहे. गत ११९ वर्षांत एकादाही खाण क्षेत्र वाढविण्यात आले नाही. खाणींचे विस्तारीकरण झाल्यास येथे रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.

देशात डोंगरी बु. येथील खुली आणि तिरोडी येथील भूमिगत खाण देशात अव्वल आहे. मँगनीज हा धातू बहुपयोगी असून औषधी, फर्टीलायझर, लोखंड तयार करण्यासाठी उपयोगात येतो. सध्या देशात सर्वात जास्त मँगनीज गुजरात राज्यात जात आहे. सर्वे ऑफ इंडियाने येथे सर्वेक्षण करून भूगर्भात मँगनीजचा मोठा साठा असल्याचा अहवाल दिला होता. याशिवाय तुमसर तालुक्यातील कारली, गारकाभोंगा, आसलपाणी, झंझेरीया, रोंघा, येदरबुची, घानोड, सक्करदरा, हिवरा(मोहाडी) या परिसरात मँगनीजचा साठा भूगर्भात आहे.

१९८० मध्ये राखीव वन कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे खाण क्षेत्र विस्तारीकरणाला अडचण निर्माण झाली. खाण क्षेत्र विस्तारीकरणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात येते. खाण क्षेत्र गावाजवळ येऊ नये व गावाला त्याचा फटका बसू नये यासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या विरोध आहे. सुंदरटोला गावाजवळ चारशे एकर जागा आहे. परंतु विस्तारीकरणाला हिरवा झेंडा न मिळाल्याने प्रस्ताव रखडला आहे.

आरोग्य व मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

जगप्रसिद्ध खाण परिसरातील गावात अजूनही आरोग्य व मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नियमाप्रमाणे खाण प्रशासनाने खाण परिसरातील गावात आरोग्य व मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याचा नियम आहे. परंतु त्याचा येथे अभाव दिसून येतो. त्यामुळे नगरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

खाणीकडे जाणारे रस्ते खड्डेमय

चिखला व डोंगरी खाणीकडे जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे. खाण परिसरातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचीसुद्धा दुर्दशा झाली आहे. ओव्हरलोड ट्रक रात्रंदिवस धावत असतात. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.

शुद्ध पाण्याचा अभाव

खाण परिसरातील गावात पाण्याची सुविधा आहे. अनेक गावात विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. ही योजना बावनथडी धरणावर आहे. मात्र, मुबलक पाणीपुरवठा होत नाही. नाईलाजाने नागरिकांना विहिरीचे पाणी प्यावे लागते. खाण परिसरातील गावात विहिरींचे पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांचे आजार बळावले आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकGovernmentसरकार