शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

सभापती, उपसभापती व सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार

By युवराज गोमास | Updated: April 30, 2024 21:08 IST

चौकशीची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी.

भंडारा : भंडारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींसह सर्वच सदस्यांनी गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे यांच्या मनमर्जी कारभाराला कंटाळून नाराजी व्यक्त करीत ३० एप्रिल रोजी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित मासिक बैठकीवर बहिष्कार टाकला. तसेच कामकाजात सुधारणा न झाल्यास सर्वच मासिक सभांवर बहिष्कार कायम राहण्याचा इशारा दिला. सभापतींच्या दालनात पत्रकारांशी संवाद साधताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची तसेच चौकशी करण्याची अपेक्षा व्यक्त केली.बहिष्कार आंदोलनात सभापती रत्नमाला चेटुले, उपसभापती प्रशांत खोब्रागडे, सदस्य पंकज लांबट, विलास लिचडे, किशोर ठवकर, स्वाती मेश्राम, गीता कागदे, कांचन वरठे, भागवत हरडे, राजेश वंजारी, किर्ती गणवीर, वर्षा वैरागडे, संजय बोंदरे, कल्पना कुर्झेकर, रिषिता मेश्राम, नागेश भगत, प्रभाकर बोदेले, काजळ चवळे, सीमा रामटेके, भाग्यश्री कांबळे यांचा समावेश आहे.

भंडारा पंचायत समितीत १४५ गावे व ९४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या ६ आहे. प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळा कार्यरत आहेत. पंचायत समितीमार्फत पशुसंवर्धन, कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, रोजगार हमी, घरकूल आदी व अन्य कामे संचालित होतात. परंतु, भंडारा पंचायत समिती व गाव पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गटविकास अधिकाऱ्यांचा वचक नाही. अधिकारी व कर्मचारी केव्हाही कार्यालयात येतात आणि जातात. सर्वसामान्य नागरिकांना आल्यापावली परतावे लागते. पंचायत समिती सदस्य, सभापती व उपसभापतींकडे नागरिकांच्या या संबंधी वारंवार नागरिक तक्रारी करीत असतात. गटविकास अधिकाऱ्यांच्या कानावर नागरिकांच्या तक्रारी ठेवूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेलगाम वर्तणुकीवर नियंत्रण येताना दिसत नाही. उलट अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठबळ देतात. गाव पातळीवर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांचे निमंत्रण पंचायत समिती सदस्यांना संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांकडून दिले जात नाही.

यासंदर्भात गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे यांच्याशी संपर्क साधला त्या म्हणाल्या, मी आता या विषयावर प्रतिक्रिया देवू शकत नाही. मी एका समारंभात आहे, असे सांगितले. ...ही आहेत बहिष्काराची कारणेगटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे या पंचायत समितीचे कामकाज चालविताना सभापती, उपसभापती व सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. मनमर्जीने परस्पर कामे करतात. पंचायत समितीच्या मासिक सभेत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी केली जात नाही. सदस्यांना माहिती दिली जात नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लेटलतीफ कामकाजावर व निष्काळजीपणावर तक्रार देऊनही कारवाई केली जात नाही. पंचायत समिती सदस्यांच्या अधिकाराचे गटविकास अधिकाऱ्यांकडून हनन केले जात आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा