शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसासह दोघे 'एसीबी'च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:48 IST

पकडलेल्या अवैध रेती ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी पोलीस शिपायासह एका खाजगी व्यक्तीला दहा हजार रूपयाची लाच घेताना मोहाडी येथे रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने केली.

ठळक मुद्देदहा हजारांची लाच : मोहाडी येथे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पकडलेल्या अवैध रेती ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी पोलीस शिपायासह एका खाजगी व्यक्तीला दहा हजार रूपयाची लाच घेताना मोहाडी येथे रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने केली.आशिष भास्कर तिवाडे (३४) असे पोलीस शिपायाचे तर नेतराम शंकर साठवणे (३५) रा. मोहाडी असे खाजगी इसमाचे नाव आहे. या दोघांविरूद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहेगाव येथील एका ठेकेदाराचे रेतीचे ट्रॅक्टर सूरनदीपात्राजवळ पकडण्यात आले होते.या प्रकरणी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी शिपाई आशिष तिवाडे याने दहा हजार रूपयाची मागणी केली. त्यावरून तक्रारदाराने थेट भंडारा येथील एसीबीचे कार्यालय गाठले. त्यावरून शुक्रवारी सायंकाळी मोहाडी येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून दहा हजार रूपये स्विकारताना नेतराम शंकर साठवणे याला पकडण्यात आले. त्याने ही रक्कम पोलीस शिपाई आशिष तिवाडे याच्यासाठी घेतल्याचे सांगितले. दोघांविरूद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश मुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक महेश चाटे, प्रताप भोसरे, योगेश्वर पारधी, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, कोमल बनकर, कृणाल कढव, सुनील हुकरे, दिनेश धार्मिक यांनी केली. सदर प्रकरणी दोघांविरूद्ध मोहाडी पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी या दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस