शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कोरोना आल्यापासून दोन-दोन दिवस बोहणीही होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

कोरोना प्रादूर्भावानंतर शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनने सर्वकाही ठप्प झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर हाल सुरु आहेत. तीन महिने झाले तरी कोरोना संपुष्टात यायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवून गुजराण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत.

ठळक मुद्देसायकल रिक्षा चालकांची व्यथा, सरकारी धान्यावर सुरु आहे गुजराण, स्वयंसेवी संस्थांनीही दिला मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साहेब कोरोना आला तेव्हापासून दोन-दोन दिवस साधी बोहणीही होत नाही. ३२ वर्षापासून भंडारात सायकलरिक्षा चालवतो. पण असे कठीण दिवस कधी बघितले नाही. पूर्वी रोज ५००-६०० रुपये घरी घेऊन जायचो. पण कोरोनापासून १००-२०० ही मुश्कीलीने हातात पडतात. सरकारी धान्य मिळत असल्याने कशीतरी गुजराण सुरु आहे. असे रिक्षाचालक माणिक शहारे आपली व्यथा सांगत होते.कोरोना प्रादूर्भावानंतर शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनने सर्वकाही ठप्प झाले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर हाल सुरु आहेत. तीन महिने झाले तरी कोरोना संपुष्टात यायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवून गुजराण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत.लॉकडाऊनने या रिक्षाचालकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. भंडारा शहरात ३२ वर्षापासून रिक्षा चालविणारे राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील रहिवासी माणिक शहारे यांनी आपबिती सांगितली, तेव्हा अंगावर अक्षरश: शहारे आले. आधीच सायकलरिक्षात बसणे सुशिक्षितांना कमीपणाचे वाटते. मात्र मुलांना शाळेत सोडणे आणि मालवाहतुकीतून घरखर्च भागायचा. परंतु आता लॉकडाऊनने आमचे सर्वस्वच गमावून बसलो आहे. तीन-तीन दिवस साधी बोहणीही होत नाही. घरी पैसे नेले नाही तर कुटूंब कसे चालवायचे? असा सवाल ते करतात.नवीन टाकळी परिसरातील दिगंबर गायधने २७ वर्षापासून भंडारा शहरात सायकलरिक्षा चालवितात. आपल्या उभ्या आयुष्यात असे संकट कधीच अनुभवले नाही. एकही दिवस असा गेला नाही की आपण रिकाम्या हाताने घरी गेलो. मात्र कोरोना पासून दिवसभर भटकूनही हातात एक रुपयाही मिळत नाही. घरखर्च चालवावा कसा असा प्रश्न असल्याचे ते सांगतात. अशीच अवस्था शहरातील इतरही रिक्षाचालकांची आहे. शासनाने दिलेले धान्य आणि स्वयंसेवी संस्थाकडून मिळालेल्या मदतीवर गुजराण सुरु आहे. परंतु कोण किती दिवस देणार. एकदाचा हा कोरोना संपला पाहिजे, असे दिगंबर आणि माणिक यांनी सांगितले.कोरोनाचा फटकाभंडारा शहरात ५० च्या आसपास सायकलरिक्षा चालक आहेत. २० वर्षापूर्वी शहरात रिक्षांची संख्या तीन हजारांच्या घरात होती. मात्र आधुनिक साधनांमुळे रिक्षा कमी होत गेल्या. मात्र आजही अनेक जण सायकलरिक्षावरच आपल्या संसाराचा गाढा ओढत आहेत. लॉकडाऊनने या रिक्षाचालकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.सायकलरिक्षाला दिवस वाईटभंडारा शहरात सवारीचे हमखास साधन म्हणजे सायकलरिक्षा. अनेकांनी सायकलरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा गाढा ओढला. परंतु आॅटोरिक्षा आणि मोटारसायकलची संख्या वाढली आणि सायकलरिक्षाला वाईट दिवस आले. सुशिक्षित व्यक्ती सायकलरिक्षात बसायला मागेपुढे पाहतात. भाड्यासाठी अनेकदा घासाघीस करतात. गत दहा वर्षापासून सायकलरिक्षाला भंडारा शहरात तरी वाईट दिवस आले. त्यामुळे आता अनेक जण मुलांना शाळेत पोहचून देणे आणि दिवसभर सायकलरिक्षाची मालगाडी करून दुकानातील साहित्य इकडून तिकडे रोजीरोटी कमावतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या