शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:01 IST

चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेल्या एका युवकाचा मृतदेह तुमसरजवळील खापा काटेबाम्हणी रस्त्याच्या कडेला आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली. आशिष सुरेश पावडे (२१) रा. राजूरा (जि. चंद्रपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देमुलाची हत्या झाल्याचा वडिलांचा आरोप : शवविच्छेदन अहवाल उलगडणार रहस्य

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेल्या एका युवकाचा मृतदेह तुमसरजवळील खापा काटेबाम्हणी रस्त्याच्या कडेला आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली.आशिष सुरेश पावडे (२१) रा. राजूरा (जि. चंद्रपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. आशिष हा रामटेक येथील किट्स अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. दरम्यान माझ्या मुलाची हत्या करण्यात असा आरोप मृतकाच्या वडिलांनी केला आहे. त्याचा मृतदेह तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गाजवळ हाकेच्या अंतरावरील काटेबाम्हणी-खापा रस्त्याच्या कडेला गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आढळला. तुमसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर प्रकरणाचा उलगडा होईल, असे सांगण्यात आले.आशिषचे वडील तुमसरात शुक्रवारी दाखल झाले. त्यांनी माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे, असे सांगितले. रामटेके ते तुमसर अंतर मोठे आहे. तुमसरशी त्याचा काहीच संबंध नाही. तो इकडे येवूच शकत नाही. येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुरेश पावडे यांनी केली आहे.गुरूवारी सकाळी वडील सुरेश पावडे यांनी आशिषला फोन केला होता, परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याच्या आईने व लहान भावानेही भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी २ वाजताच्या सुमारास त्याचा मोबाईल स्वीच आॅफ दाखवित होता. आशिषच्या बँक खात्यात ५५ हजार रूपये काही दिवसापुर्वी घातले होते. मृत्युसमयी त्याच्या खिशात सात ते आठ हजार रूपये होते. त्याची हत्या इतरत्र करून त्याचा मृतदेह काटेबाम्हणी शिवारात फेकून देण्यात आला, असा कयास आहे.

टॅग्स :Murderखून