शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

किन्हीत तरुणाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:20 IST

प्रेम प्रकरणाच्या संशयातून एका २२ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील किन्ही येथे घडली असून अनिकेत अशोक बडोले असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर अनिकेतचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. याप्रकरणी साकोली पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देवीस तासानंतर झाले शवविच्छेदन : प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : प्रेम प्रकरणाच्या संशयातून एका २२ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील किन्ही येथे घडली असून अनिकेत अशोक बडोले असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर अनिकेतचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. याप्रकरणी साकोली पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.माहितीनुसार, अनिकेत हा शुक्रवार १८ जानेवारीपासून बेपत्ता होता.अनिकेतच्या कुटूंबीयांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र अनिकेतचा कुठेही शोध लागला नाही. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारा अनिकेतचा मृतदेह किन्ही गावाजवळ असलेल्या नाल्यात आढळून आला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पोहचताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.प्राथमिक माहितीवरुन अनिकेतचा गळा आवळून खून केल्याचे दिसून आले. त्याने घातलेल्या टिशर्टनेच त्याचा गळा आवळण्यात आल्याचे दिसून आले. माहिती मिळताच साकोली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. शवविच्छेदनासाठी अनिकेतचा मृतदेह साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मात्र रात्र झाल्यामुळे शवविच्छेदन होवू शकले नाही.रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. अनिकेतचे गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते, अशी चर्चा आहे. या प्रेमसंबंधाच्या संशयातूनच त्याची हत्या झाली असावी अशा साकोली पोलिसांचा कयास आहे.मृतक अनिकेत याच्या मोठ्या भावाच्या तक्रारीवरुन साकोली पोलिसांनी किन्ही येथील चार जणांविरुध्द भांदविच्या ३०२, २०१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रेवतकर, खोब्रागडे, पोलीस नायक श्रीकांत मस्के, प्रशांत गुरव, पोलीस शिपाई पी. सी. सोनुने करीत आहेत.