शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘लोकमत’ची रक्तदान चळवळ प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST

रक्तदानाने रक्त कमी होत नसून शरीरात नव्या रक्ताची निर्मिती होते. ४६ वर्षांच्या आयुष्यात आपण ४६ वेळा रक्तदान केल्याचे सांगत त्यांनी रक्तदानासाठी तरुणांना प्रोत्साहित केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिरात ते बोलत होते.

ठळक मुद्देमनोहर कोरेट्टी : लाखांदूर येथे रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कोरोना संकट काळात  सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून अशा संकटात ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान महायज्ञाची चळवळ सुरू केली. ही रक्तदान चळवळ सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांनी केले. रक्तदानाने रक्त कमी होत नसून शरीरात नव्या रक्ताची निर्मिती होते. ४६ वर्षांच्या आयुष्यात आपण ४६ वेळा रक्तदान केल्याचे सांगत त्यांनी रक्तदानासाठी तरुणांना प्रोत्साहित केले.स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिरात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, ठाणेदार मनोहर कोरेट्टी, ठाणेदार नीलेश गावंडे, वनपरीक्षेत्रधिकारी रुपेश गावीत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विरसेन चहांदे, संदीप ताराम, अमोल कोकाटे, जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक रवी मेश्राम, माजी नगरसेवक बंटी सहजवाणी, माजी नगरसेवक नीलिमा टेंभुर्णे, कॉंग्रेसचे मनोज बंसोड, उत्तम भागडकर, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज हटवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष ॲड. मोहन राऊत, चंद्रशेखर टेंभुर्णे, खेमराज भुते, गिरीधर नागेश्वर, तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, भोजराज कडीखाये, मुख्याध्यापक गोरखनाथ वंजारी, विजय खापर्डे उपस्थित होते. रक्त संकलन डॉ. सचिन करंजेकर, सुरेखा भिवगडे, रक्तपेढी परिचर राजू नागदेवे, राहुल गिरी, मयूर खोब्रागडे यांनी केले. यावेळी यामिनी देशमुख, अनामिका कोड्डे, दुर्गा भुते, तेजस्विनी वरंभे यांनी सहकार्य केले.शिबिरासाठी योगेश देशकर, मिलिंद परशुरामकर,जागेश्वर कांबळे, आकाश तिघरे, रोहित भुरले, मोहित रायपुरे, सौरभ राऊत, सिद्धार्थ युथ क्लबचे अध्यक्ष कामेश बावणे, निखिल मोहुर्ले, कुलदीप दोनाडकर, सौरभ बंसोड, साहिल गजभिये, अभिषेक घोरमोडे, दर्शन मेश्राम, नितीन पारधी, ‘लोकमत’चे वितरक प्रमोद टेंभुर्णे, तालुका सखी संयोजिका कल्पना जाधव यांचे सहकार्य मिळाले. संचलन लोकमत तालुका प्रतिनिधी दयाल भोवते यांनी केले तर आभार साकोली लोकमत सखी मंच संयोजिका सुचिता आगाशे यांनी मानले.

अधिकाऱ्यांचे रक्तदान- लाखांदूर येथील रक्तदान शिबिर आगळेवेगळे ठरले. या शिबिरात तालुक्यातील अधिकाऱ्यांनी : रक्तदान केले. यात नायब तहसीलदार,  वनपरिक्षेत्रधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक यांचा समावेश आहे. रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी स्वत: रक्तदान करून युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.

यांनी केले रक्तदान- नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, वनपरीक्षेत्रधिकारी रुपेश गावीत, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, शिक्षक प्रेमलाल गावडकर, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज हटवार, जयपाल राऊत, दर्शन मेश्राम, मिलिंद परशुरामकर, रोहित सोनवने, साहिल गजभिये, मुदतशिर पठाण, अभिषेक घोरमोडे, कुलदीप दोनाडकर, कामेश बावणे, निखिल मोहुर्ले, दयाल भोवते आदींनी रक्तदान केले.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट