लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकमत वृत्तपत्र समूह व लाईफलाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमतचे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, युवती, नागरिक, सेवाभावी, शासकीय, खासगी संस्था, समाजसेवक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ता, युवा नेक्स्ट व सखी मंच सदस्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक रक्तदात्यास रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणपत्र देण्यात येईल. रक्तदानाचे स्थळ लवकरच प्रकाशित करण्यात येईल. या रक्तदान अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत समूहातर्फे करण्यात आले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी कार्यक्रम संयोजक ललीता घाटबांधे (९०९६०१७६७७), सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२ यांच्याशी संपर्क साधता येईल.
जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबिर
By admin | Updated: July 1, 2017 00:23 IST