शिबिराच्या सुरुवातीला शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी कोरोनासारख्या कठीण काळामध्ये डॉक्टरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी वैद्यकीय सेवा पुरविली. त्यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डाॅ. प्रशांत थोटे, डॉ. शरद गोमासे, डॉ. योगेश गिरेपुंजे, डॉ. विजय सव्वालाखे, डॉ. अशोक जिभकाटे, डॉ. प्रशांत चकोले, डॉ. चेतन भागवतकर, डॉ. सुरेश बुधे, डॉ. उल्हास बुराडे, डॉ. योगेश बुराडे, डॉ. प्रवीण फेंडर, डॉ. सुमित मदनकर, डॉ. श्रीकांत मोहतुरे, डॉ. युवराज जमईवार, मोहाडी तालुका पत्रकार संघाचे सिराज शेख, अफरोज पठाण, नरेंद्र निमकर, राजू बांते, सुनील मेश्राम, यशवंत थोटे, किराणा व्यापारी संघटनेचे विलास वाडीभस्मे, तालुका केमिस्ट असोसिएशनचे हितेश साठवणे, रेवती बारई, पलाश पाटील या संघटनांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन डाॅ. प्रशांत थोटे यांनी केले होते.
मोहाडी येथे ६० दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST