लाखनी : शहीद दिनाचे औचित्य साधत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने देशव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने लाखनी येथे आयोजित रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये पुरुष मंडळींसह युवक-युवती व महिलांनीदेखील रक्तदान केले.
उद्घाटन कार्यक्रमाला तहसीलदार मलिक विराणी, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे, समर्थ महाविद्यालय, लाखनीचे प्राचार्य डॉ. संजय पोहरकर, नीमाचे माजी जिल्हा सचिव डॉ. दिलीप फरांडे, नीमा जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, सचिव डॉ. केशव कापगते, कोषाध्यक्ष डॉ. अमित जवंजाळ, काँग्रेस नेते शफी लद्धानी, ग्रामीण रुग्णालयचे अधीक्षक डॉ. बोदलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हटनागर, दिनेश पंचबुद्धे, अर्पित गुप्ता उपस्थित होते.
शिबिराच्या सुरुवातीला शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी कोरोनासारख्या कठीण काळामध्ये डॉक्टरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी वैद्यकीय सेवा पुरविली त्यांना कोरोनायोद्धा सन्मानपत्र देण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. गणेश मोटघरे, डॉ. अतुल दोनोडे, डॉ. राजेश चंदवानी, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. रवी हलमारे, डॉ. टिकेश करंजेकर, डॉ. देवेंद्र धांडे, डॉ. अभय हजारे, डॉ. सचिन झंजाड, डॉ. रणजित वाघाये, वाल्मिक लांजेवार, चंदन मोटघरे, अंगेश बेहलपांडे, संजय वनवे, उमेश सिंगनजुडे, मोहन निर्वाण, प्रशांत वाघाये, प्रीतम निर्वाण, करण व्यास, राज गिरेपुंजे आणि पत्रकार संघ, लाखनी, मॉर्निंग ग्रुप, लाखनी, लाखनी मित्रपरिवार, स्वप्नपूर्ती फाउंडेशन, लाखनी, शिवरुद्रम ग्रुप, सृष्टी नेचर क्लब, पुज्या सिंधी पंचायत, लक्ष्मणराव दोनोडे ट्रस्ट, साद माणुसकीची समूह, शिवजयंती उत्सव समिती, पतंजली योग समिती, शिवनीबांध जलतरण संघटना, समर्थ महाविद्यालय, लाखनी, नरेंद्र महाराज सेवा मंडळ, लाखनी या संघटनांचे सहकार्य लाभले. रक्त संकलन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या शिबिराचे प्रास्ताविक नीमा जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांनी, तर संचालन प्रशांत वाघाये, तर डॉ. अमित जवंजाळ यांनी आभार मानले.