शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

रस्ता रुंदीकरणात वीज खांबांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

निलज ते भंडारा या राज्यमार्गाची अवस्था पुर्णपणे खराब झाली होती. काळाची गरज म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. हा निर्णय अतिशय योग्य आहे. रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याचे खोलीकरण करुन त्यांना नवीन बनविणे सुरु आहे. या राज्यमार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तरीही वाहनचालक कोणतीही तक्रार न करता त्रास सहन करुन प्रवास करीत आहेत.

ठळक मुद्देअपघातात वाढ। निलज ते भंडारा राज्यमार्गाचे बांधकाम जोमात सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा चौ : निलज ते भंडारा राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम जोमाने सुरु आहे. मात्र वीज वितरण कंपनीने या मार्गावरील वीज खांब बाजूला न केल्यामुळे रस्ता रुंदीकरणात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. हा राज्यमार्ग वर्दळीचा असून रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे या खांबामुळे वाहनास अडथळा निर्माण होत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावर किंवा एखादा जीव गेल्यावर वीज प्रशासनाला जाग येईल का, अशा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.निलज ते भंडारा या राज्यमार्गाची अवस्था पुर्णपणे खराब झाली होती. काळाची गरज म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. हा निर्णय अतिशय योग्य आहे. रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याचे खोलीकरण करुन त्यांना नवीन बनविणे सुरु आहे. या राज्यमार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तरीही वाहनचालक कोणतीही तक्रार न करता त्रास सहन करुन प्रवास करीत आहेत. मात्र राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूला वीज खांब जसेचे तसे उभे असल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असल्यामुळे कडेला असलेले खांब रस्त्यावर आले आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष देवून वीज वितरण कंपनीने लक्ष देवून त्वरीत वीज खांब हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.जनहितासाठी काढावा तात्काळ पर्यायनिलज- भंडारा या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे वीज खांब जर मार्गाच्या मध्यभागी असतील तर या मार्गाच्या रुंदीकरणाला काहीच उपयोग राहत नाही. अशा रस्ते बांधकामामुळे अपघात होऊन नागरिक व वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने आपआपल्या नियमांच्या मर्यादा लक्षात घेवून लोकांचे जीव वाचवावेत यासाठी संयुक्तरित्या पर्याय काढणे आवश्यक आहे.निलज - भंडारा या रस्त्याचे जोमाने काम सुरु आहे. मात्र रस्त्यावरील खांब अडचण निर्माण करीत आहेत. याकरिता दोषी वीजवितरण कंपनी आहे किंवा बांधकाम विभाग आहे. या संदर्भात जनतेला काही देणे नाही. अपघात होवू नये, एखाद्याचा जीव जावू नये हे महत्वाचे आहे. खांब हटविणे ही जबाबदारी बांधकाम व वीज वितरण कंपनीचा आहे. रस्ता रुंदीकरणामुळे जनतेला त्रास होवू नये हे महत्वाचे आहे. एखादा अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनी राहील.- बाळू फुलबांधे,भंडारा विधानसभा प्रमुख, शिवसेना

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाelectricityवीज