शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अंध ‘बेनिराम’ ठरला आदर्श गावात ‘लयभारी’

By admin | Updated: February 21, 2016 00:22 IST

ज्या मुलींना अंगाखांद्यावर खेळवून लहानाचे मोठे केले....

लोकमत शुभवर्तमान : रोंघा येथे मुलींच्या सहकार्याने बांधले शौचालय$$्रिप्रशांत देसाई ल्ल भंडाराज्या मुलींना अंगाखांद्यावर खेळवून लहानाचे मोठे केले. परंतु, शरीराने साथ देण्याचे सोडल्याने संपूर्ण आयुष्य उमेदीत जगणाऱ्या वडीलांना मुलींकडे शौचालय बांधून देण्याची गळ घालावी लागली. आयुष्यभर कुणाकडे हात न पसरविणाऱ्या वडिलांच्या आगळ्यावेगळ्या मागणीने मुलींनीही आर्थिक मदत केली व जावयांनी श्रमदान करून शौचालय बांधून दिले. तुमसर तालुकास्थळापासून ४० किमी अंतरावरील घनदाट जंगलात वसलेले रोंघा येथील बेनिराम कोडवते यांनी हा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. १,८२१ लोकवस्तीच्या गावातील हा प्रकार आहे. आमदार अनिल सोले यांनी रोंघा हे गाव दत्तक घेतले आहे. या आदर्श गावातील बेनिरामचे कुटुंब हागणदारीमुक्त गावाच्या यादीत ‘लयभारी’ ठरले आहे. या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथील नागरिक शेती व मोलमजुरीतून उपजिवीका करतात. बेनिराम यांच्याकडे अर्धा एकर शेती आहे. मात्र, सिंचनाची व्यवस्था नसल्याने निसर्गाच्या भरोशावर शेतीतून उत्पन्न घेतले जाते. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने बेनिरामने कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी गावातच चहाचे छोटेसे दुकान थाटले. यातूनच त्यांनी त्यांच्या तीन मुली व एका मुलाचे विवाह आटोपले. दरम्यान ७१ व्या वर्षी बेनिरामला डोळ्याचा आजार जडला. उतारवयात बेनिरामच्या आयुष्यात अंधार पसरला. यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यांना पत्नी गयाबाई व मुलगा समर्थपणे साथ देत आहे.आजपर्यंतची हयात त्यांनी उघड्यावर शौचास जावून काढले. यावेळी त्यांना अनेकांनी शौचालय बांधण्याचे सुचविले, पण कुणाचे ऐकेल तो बेनिराम कसला. दृष्टिदोष झाल्याने व शरीराचीही साथ मिळत नसल्याने मुलींकडून शौचालयासाठी पैसे मागितले व ते बांधकाम करून त्याचा वापर सुरू केला आहे. रोंघा गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पल्लवी तिडके, शशिकांत घोडीचोर, अनिता कुकडे, हर्षाली ढोके, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, सरोज वासनिक हे गृहभेट, समूह सभेच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत. अंध बेनिरामने शौचालय बांधण्याचा समाजाला दिलेला संदेश उघड्यावर शौचास जाणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.मुलींची मदत ठरली लाखमोलाची अंधत्व आल्याने बेनिरामने त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांची विवाहित मुलगी रत्नमाला खरवडे, प्रतिमा तुमडाम व चंद्रकांता मरकाम यांच्याकडे कथन केली. लहानपणी ज्या वडिलांनी अंगाखांद्यावर खेळवून मोठे केले, त्यांचे उर्वरित आयुष्य सुखी जावे यासाठी तिन्ही मुलींनी प्रत्येकी चार हजार रूपयांची मदत केली. यातून बेनिराम यांनी शौचालयाचे बांधकाम केले. व ते गावातील पहिले ‘लयभारी’ ठरले.सरपंच, सचिवाचा पुढाकारगावाच्या विकासाची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच विजय परतेती व सचिव योगेश माटे व जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले यांनी त्यांच्या सहकार्यांसह गावाचा चेहरामोहरा बदलविण्याचा मानस केला. यात त्यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कक्षाच्या मदतीने गावातील शौचालय नसलेल्या घरांचा सर्व्हे केला. व शौचालयाच्या उपयोगितेची माहिती दिली. ही बाब बेनिरामच्या लक्षात येताच त्यांनी सर्वप्रथम त्याची सुरूवात केली.बेनिरामने शौचालयासाठी दाखविलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. या प्रमाणेच अन्य कुटुंबीयांनी पुढाकार घेतला तर गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी वेळ लागणार नाही.- केशव गड्डापोळसंवर्ग विकास अधिकारी, तुमसर.