राजकुमार बडोले : सानगडी, कुंभलीत प्रचार सभा साकोली : क्रिकेटपटू सचिन तेंदुलकर यांना भारतरत्न देऊन गौरविणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने बाबासाहेबांना भारतरत्न ही पदवी देण्यासाठी तब्बल ४० वर्षे लावली. मताच्या राजकारणासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने दलितांचा वापर केला असे सांगून सत्तेत येताच भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे लंडन येथे राहत असलेले घर घेऊन भाजपने ऐतिहासीक निर्णय घेतला, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सानगडी व कुंभली येथे प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष शंकर राऊत, माजी सभापती रेखा भाजीपाले, संदीप बावनकुळे, लाला पुरानकर, लखन बर्वे, रतीराम गिऱ्हेपुंजे, देवा लांजेवार, निताराम भेंडारकर, उमाशंकर पर्वते, अंताराम खोटेले, जोत्सना धोरमारे, वंदना उके, हेमंत ब्राम्हणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भोजराज कापगते यांनी तर आभारप्रदर्शन संदीप बावनकुळे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
बाबासाहेबांचे घर खरेदीचा भाजपचा निर्णय ऐतिहासिक
By admin | Updated: July 3, 2015 00:52 IST