शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भासाठी भाजपने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:58 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र व राज्यात भाजपचे राज्य आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीच्या दिशेने वाटचाल करावी, ....

ठळक मुद्देरामदास आठवले : भंडारा येथे पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र व राज्यात भाजपचे राज्य आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीच्या दिशेने वाटचाल करावी, असे रोखठोक मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.गुरूवारी सायंकाळी ५ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष आर.एस. वानखेडे, जिल्हाध्यक्ष आशित बागडे, माजी आमदार अनिल गोंडाने, राजन वाघमारे, बाळू घरडे, विनोद थुले, मनोहर मेश्राम आदी पदाधिकारी उपस्थित होते.ना. आठवले सत्य स्थितीनुसार महाराष्ट्रात राहून विदर्भाला न्याय मिळू शकत नाही. औद्योगिक विकास परिणामत: रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या हेतूने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे नितांत गरजेचे आहे. भाजप विदर्भ राज्य व्हावे यासाठी अनुकूल मताचे आहे. आणि ही बाब विदर्भ राज्य निर्मितीसाठी महत्वाची भूमिका वटवू शकते. मेघालय, त्रिपुरा व नागालैंड राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुका संदर्भात बोलताना आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने आपले उमेदवार उभे केले आहेत. यासाठी भाजपचे समर्थन दिले आहे. एनडीए घटक दलाचे सदस्य असल्याने अन्य राज्यातही भाजपचे राज्य यावे, असेही ते म्हणाले. २०१९ च्या निवडणुका संदर्भात ते म्हणाले की, राज्यात भाजपा, शिवसेना व रिपब्लिकन पक्ष मिळून निवडणूक लढविली पाहिजे. एकला चलो रे या भूमिकेमुळे अपेक्षित परिणाम मिळणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून भाजपची शिवसेने बाबत असलेले नाराजगी दूर करावी, असे मत व्यक्त केले आहे. येणाºया काळात केंद्रात भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा आशावादही ना. आठवले यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले