शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप हा परिवाराचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:01 IST

भारतीय जनता पक्ष हा कोणत्या एका परिवाराचा पक्ष नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : भाजपची विस्तारित बैठक, जिल्हा भाजपने केला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतीय जनता पक्ष हा कोणत्या एका परिवाराचा पक्ष नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात व्यक्ती कोणतीही असो, कितीही मोठी असो महत्व कार्यकर्त्यांचेच आहे. आज लहान दिसणारा कार्यकर्ता केव्हा मोठा दिसेल याचा नेम नाही. सर्वांनी एकत्रित पणे पक्ष हित लक्षात ठेवून सर्व सामान्याचा उत्थानाकरिता कार्य केले पाहिजे. हीच पंडित दिनदयालजी उपाध्यक्ष यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन सहपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.भंडारा येथे आयोजित भाजपच्या कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी होते. यावेळी बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष खासदार नाना पटोले म्हणाले, मी शेतकºयांचा हितासाठी कार्य करणारा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त अन्य कोणताही पक्ष शेतकºयांच्या दुरगामी हिताचा निर्णय घेऊ शकत नाही. काही लोक माझ्या बाबतीत शंकेचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये त्यांना यश मिळणार नाही. मी भाजपामध्येच राहणार आहे. तत्पूर्वी विदर्भ शिक्षक सेलचे संयोजक डॉ. उल्हास फडके यांनी संकल्प ते सिद्धी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश बांते यांनी ग्रामपंचायत निवडणूक, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी जीएसटीवर तर जिल्हा महामंत्री मुकेश थानथराटे यांनी भाजपा भंडारा जिल्हा आवाहने व समाधान या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी ना.बावनकुळे यांचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. चैतन्य उमाळकर यांच्या गीताने प्रारंभ झालेल्या सभेचे प्रास्ताविक प्रशांत खोब्रागडे यांनी तर संचालन अंगेश बेलपाडे यांनी केले. यावेळी आ.परिणय फुके, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशीवार, भरत खंडाईत, नगराध्यक्ष सुनिल मेंंढे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, धनंजय मोहोकर, सविता ब्राम्हणकर, रामकुमार गजभिये उपस्थित होते.