शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पणन कार्यालयाला भाजपने ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 05:00 IST

धान उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु शासन या प्रश्नाकडे गांर्भीयाने पाहत नाही. त्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी येथील जिल्हा पणन कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांचे धानाचे थकीत असलेले बाेनसचे पूर्ण पैसे त्वरित द्यावे, धानाची भरडाई तत्काळ करावी, शिल्लक असलेला सर्व धान खरेदी करावा, अशा मागण्या करीत जिल्हा पणन कार्यालयाला कुलूप ठाेकले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे प्रश्न : थकीत बाेनस द्यावा आणि संपूर्ण धानाची उचल करावी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  शेतकऱ्यांना थकीत बाेनस द्यावा आणि संपूर्ण धानाची उचल करावी, या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत येथील जिल्हा पणन कार्यालयाला शुक्रवारी कुलूप ठाेकले. भाजपचे शेकडाे कार्यकर्ते कार्यालयावर धडकले हाेते. या आंदाेलनाचे नेतृत्व खासदार सुनील मेंढे, आमदार डाॅ. परिणय फुके, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिरिपुंजे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर यांनी केले. धान उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु शासन या प्रश्नाकडे गांर्भीयाने पाहत नाही. त्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी येथील जिल्हा पणन कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांचे धानाचे थकीत असलेले बाेनसचे पूर्ण पैसे त्वरित द्यावे, धानाची भरडाई तत्काळ करावी, शिल्लक असलेला सर्व धान खरेदी करावा, अशा मागण्या करीत जिल्हा पणन कार्यालयाला कुलूप ठाेकले. यानंतर शेतकऱ्यांचा माेर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्या ठिकाणी आंदाेलनकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पणन अधिकारी कार्यालयाला ठाेकलेल्या कुलपाची किल्ली जिल्हाधिकाऱ्यांकडे सुर्पुद करण्यात आली. या आंदाेलनात ब्रह्मानंद करंजेकर, नेपाल रंगारी, वामन बेदरे, राजेश बांते, तिलक वैद्य, हेमंत देशमुख, प्रदीप पडाेळे, सुदाम शहारे, विलास काटेखाये, मुन्ना फुंडे, घनश्याम खेडीकर, रेखाताई भाजीपाले, धनवंता राउत, विनाेद बांते, चंद्रप्रकाश द्रुगकर, चैतन्य उमाळकर, रामदास शहारे, काेमल गभणे, कल्याणी भुरे, संजय कुंभलकर, दिनेश निमकर, सुरेंद्र आयतुलवार, अनुष्का खैरे, विनाेद भुरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका - सुनील मेंढेशेतकऱ्यांची दिशाभूल करून अधिक काळ राजकारण केले जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना गरज असताना मदत मिळत नसेल तर शेतकरी नेते म्हणून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करणे बंद करा, अन्यथा भविष्यात आंदाेलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, अशा इशारा खासदार सुनील मेंढे यांनी दिला.आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे : फुकेआपल्या राजकारणासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांना देशाेधडीला लावण्याचे काम आघाडी सरकार करीत आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यांना त्यांचे अधिकार मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आमदार डाॅ. परिणय फुके यांनी सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरी