शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

भाजपचे जिल्हाभर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

भंडारा येथील त्रिमुर्ती चौकात सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाला प्रारंभ झाला. खासदार सुनील मेंढे, भाजप शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, ग्रामीण अध्यक्ष विनोद बांते, जिल्हा परिषद गटनेते अरविंद भालाधरे यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत त्रिमुर्ती चौकात भाजपचे पदाधिकारी ठिय्या देवून होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशासनाचा धोरणाचा निषेध : जिल्हा प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून महिलांच्या अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करीत भाजपच्यावतीने भंडारा शहरासह सहाही तालुका मुख्यालयी धरणे दिले. भंडारा येथील त्रिमुर्ती चौकात धरणे दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु ती प्रत्यक्षात उतरली नाही. सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणाही हवेतच विरली. या सरकारने एकही आश्वासन पाळले नाही. उलट कर्जमाफी योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे, असा आरोप प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.भंडारा येथील त्रिमुर्ती चौकात सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाला प्रारंभ झाला. खासदार सुनील मेंढे, भाजप शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, ग्रामीण अध्यक्ष विनोद बांते, जिल्हा परिषद गटनेते अरविंद भालाधरे यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत त्रिमुर्ती चौकात भाजपचे पदाधिकारी ठिय्या देवून होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी राजकूमार गजभिये, चैतन्य उमाळकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती उपसभापती वर्षा साकुरे, नगर परिषद सभापती आशु गोडाणे, कैलाश तांडेकर, मनोज बोरकर, राजेश टिचकुले, मधुरा मदनकर, चंद्रकला भोपे, शमीमा शेख, वनिता कुथे, गीता सिडाम, आशा उके, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वंदना वंजारी, विनोद भुरे, विष्णु हटवार, शहर युवती प्रमुख प्रिती गोसेवाडे यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.भंडारा शहरासोबतच साकोली, तुमसर, मोहाडी, पवनी, लाखांदूर, लाखनी येथेही तालुका भाजपच्या वतीने धरणे देण्यात आले. तहसीलदारांना निवेदन देवून शासनाच्या सरकार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

टॅग्स :BJPभाजपा