शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
15
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
16
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
17
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
18
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
19
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
20
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया

केंद्र-राज्यातील भाजप सरकार भांडवलदार हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:49 IST

केंद्रातील भाजपा, मोदी सरकार हे जनतेचे सरकार नसून मुठभर भांडवलदार, उद्योगपती व परदेशी कंपन्या यांचे दलाल आहे.

ठळक मुद्देसुरेश माने : साकोलीत विदर्भस्तरीय शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार महापरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : केंद्रातील भाजपा, मोदी सरकार हे जनतेचे सरकार नसून मुठभर भांडवलदार, उद्योगपती व परदेशी कंपन्या यांचे दलाल आहे. सकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणे, नियोजन, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, चुकीचे नोटबंदी धोरण व शेती, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी यांना शुन्य प्राधान्य यामुळेच देशातील शेती, शेतकरी यांच्यावर अवलंबून ८५ टक्के जनता देशोधडीला लागली आहे, अशी घणाघाती टीका बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष व घटनातज्ज्ञ अ‍ॅड़ डॉ. सुरेश माने यांनी साकोली येथे मंगळवारी पक्षाच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार महापरिषदेत केली.शेतकरी, शेतमजूर रोजगारी विरोधी धोरणांचा आकडेवार समाचार घेतांना अ‍ॅड.डॉ. माने म्हणाले, भारतात सर्वात जास्त कर्जबाजारी राज्य, शेतकरी आत्महत्येत प्रथम क्रमांकाचे राज्य, विषारी किटकनाशके शेतीसाठी वापरणारे एक नंबरचे राज्य व त्यामुळे मरणारे शेतकरी यांच्यात सुध्दा पहिल्या क्रमांकाचे राज्य हे छत्रपतींचा वारसा सांगणाºया महाराष्ट्रातील फडणवीस, सेना-भाजपा सरकारला शर्मनाक नव्हे काय असे महाराष्ट्रातील नालायक सरकार यापुढे राज्यात येणार नाही याची खबरदारी राज्यातील जनतेने घेतलीच पाहिजे अशा इशाराही त्यांनी दिला.शेती-शेतमजूर यांची फसवणूक केंद्र-राज्य सरकारे करीत आहेत. त्यासाठी जाहिरातबाजीवर करोडो रुपये उधळले जात आहेत. सरकारी बॅकांचे लाखो करोडो शेती-शेतमजूर यांची फसवणूक केंद्र-राज्य सरकारे करीत आहेत. शेतमालाचा भाव ठरविणे व गरीब शेतकºयांना मासिक रु. ५००० पेन्शन योजना सुरु करणे यासाठी केंद्र व राज्याने कायदा करण्याची गरज आहे. तसेच शेती मालाचा भाव ठरविताना शेतकºयांचे रास्त म्हणणे सरकारने स्वीकारले पाहिजे व तसे सरकारने न ऐकल्यास राज्य घटनेच्या कलम ३२३ (ब) द्वारे शेतकरी लवादाची निर्मीती करुन शेतीमाल दर शेतकºयांना मान्य नसल्यास लवादापुढे प्रकरण मांडून शेतकºयांना न्याय देणारी कायदेशीर व्यवस्था निर्माण केली पाहिजे. जमिनीचे फेरवाटप केले पाहिजे असे अनेक उपाय योजना अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी मांडले.अशाच परिषद राज्यभर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी अ‍ॅड.डॉ. सुरेश माने लिखीत ‘शेती, शेतमजूरांचे मरण हेच सरकारांचे धोरण’ ही पुस्तिका, बीआरएसपीचे विदर्भ राज्य संयोजक दशरथ मडावी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. महापरिषदेला राजू झोडे, डॉ.गणवीर, प्रा. जावेद पाशा, छायाताई कुरुळकर, विशेष फुटाने, संजय गाढवे, प्रा. वामन शेडमाके व इतर वक्त्यांनी समयोचित भाषणे केली. महापरिषदेचे स्वागत पर भाषण पक्षाचे जेष्ठ नेते दुधकवर गुरुजी यांनी तर प्रास्ताविक श्रावण भानारकर यांनी केले. संचालन पक्षाचे भंडारा जिल्हा प्रभारी राजेश बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन मनोज बन्सोड यांनी केले. या परिषदेत विदर्भातील ग्रामपंचायत सरपंच निवडणूका बीआरएसपी विजयी उमेदवारांचा शाल व पुष्पगुच्छ देवून पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर पक्षाच्या वतीने आर्थिक सहाय्य पक्षाला अर्पण करुन पक्षाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांचा सत्कार करण्यात आला.