शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येला भाजप सरकार कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त भंडारा व तुमसर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भंडारा व तुमसर येथे शिवस्वराज्य यात्रा पोहचल्यानंतर यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देशिवस्वराज्य यात्रा : भंडारा व तुमसर येथे जाहीर सभा, ठिकठिकाणी यात्रेचे जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/तुमसर : केंद्रात व राज्यात भाजपने जनतेला खोटे आश्वासने देवून सत्ता काबिज केली. दिलेल्या वचनांपैकी एकही वचन पूर्ण केले नाही. विशेषत: शेतकऱ्यांच्या जखमांवर अक्षरक्ष: मीठ चोळण्यात आले. राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षात आत्महत्या केल्या आहेत. यासाठी फक्त भाजप सरकार कारणीभूत असून अशा सरकारला सत्तेतून हद्दपार करा, असे जाहीर आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त भंडारा व तुमसर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भंडारा व तुमसर येथे शिवस्वराज्य यात्रा पोहचल्यानंतर यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.खा. अमोल कोल्हे यांनी भाजप सरकारवर शिवरायांचे किल्ले भाडेतत्वावर देण्याचा खरपूस समाचार घेतला. महागाईने उच्चांक गाठला असून देशात व राज्यात मंदीचे चावट आहे. अशा स्थितीतही भाजप सरकार आमिषे व प्रलोभने देवून भुलथापा देण्याचे कार्य करीत आहे. सभेत बेरोजगारी, जीएसटी, नोटबंदी, महिलांवरील अत्याचार यावरही उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी शिरसंधान साधले. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून विधानसभेच्या होवू घातलेल्या निवडणुकात नागरिकांनी जागृत होवून मतदान करावे, हाच त्या मागचा हेतू असल्याचेही उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले. तुमसर येथे झालेल्या सभेत मंचकावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार अनिल बावनकर, प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे, राजेश देशमुख, राजू कारेमोरे, ठाकचंद मुंगुसमारे, राजकुमार माटे, धनेंद्र तुरकर आदी उपस्थित होते.भंडारा येथे झालेल्या जाहीर सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार अमोल कोल्हे, सरचिटणीस अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचकावर प्रकाश गजभिये, महेबुब शेख, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल, महेंद्र गडकरी, सुमेध श्यामकुंवर, नरेश डहारे, यशवंत सोनकुसरे, लोमेश वैद्य, नरेंद्र झंझाड, परवेज पटेल, चेतक डोंगरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसprafull patelप्रफुल्ल पटेल