शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

भाजपलाच मिळणार पूर्ण बहुमत

By admin | Updated: June 26, 2015 00:53 IST

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींवर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा भाजपचे ...

भंडारा : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींवर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ आले असता ते पत्रपरिषदेत बोलत होते.यावेळी खा.दानवे म्हणाले, वर्षभरापूर्वी झालेली लोकसभा निवडणूक व सहा महिन्यापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मतदारांनी भाजपलाच कौल दिला आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे कामकाज तसेच मागील पाच वर्षात भंडारा जिल्हा परिषद आणि भाजपची सत्ता असलेल्या पंचायत समितीने केलेल्या कामांच्या बळावर याहीवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितींवर भाजपची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. जनसामान्यांपर्यंत विकासाची कामे पोहोचली पाहिजेत, यासाठी पक्षपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले, संपूर्ण राज्यात १ कोटी ५ लाख सदस्य नोंदणी झाली आहे. ग्रामीण भागातही भाजपची सदस्यसंख्या मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात भाजपने उमेदवारी देताना निवडून येण्यायोग्य उमेदवारांनाच उमेदवारी दिल्याचे सांगून कोणताही भेदभाव करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले. उमेदवारी न दिल्याने काहींनी अन्य पक्षात प्रवेश केलेला आहे, त्यांच्याशी भाजपचा आता कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खा.पटोले म्हणाले, या निवडणुकीत केंद्राचा व राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगून अर्बन बँकेच्या निवडणुकीत आम्ही आमचे अधिकृत पॅनेल नाही, त्यामुळे आमच्या नावाचा कुणी वापर करीत असल्यास ते चुकीचे आहे. पत्रपरिषदेला खासदार नाना पटोले, माजी खासदार शिशुपाल पटले, आमदार रामचंद्र अवसरे, संघटक महामंत्री रामदास आंबटकर, उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)