शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

तिसऱ्या आघाडीने केली भाजपा-काँग्रेसची दमछाक

By admin | Updated: October 30, 2015 00:50 IST

लाखांदूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होऊ घातली. सर्वच पक्षांनी निवडणुकीत सहभाग घेतला असला तरी...

लाखांदूर : लाखांदूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होऊ घातली. सर्वच पक्षांनी निवडणुकीत सहभाग घेतला असला तरी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार उभे केल्याने भाजपा काँग्रेस व शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगलीच दमछाक केल्याने बाजी कोण मारेल याबाबत निश्चितपणे सांगणे कठीण झाले आहे.१७ प्रभागात सर्वच पक्षाचे १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. भाजपा - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेनेसोबत नगरविकास आघाडीने यात भाग घेऊन चांगलाच वेग पकडला आहे. यापूर्वी ग्रामपंचायतवर भाजपाची सत्ता असताना या निवडणुकीत विकास कामांच्या बाबतीत आपली बाजू भाजपा मांडत असली तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीत जनतेने दिलेला कौल या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने द्यावा ही काँग्रेसची मागणी मतदारांपुढे केल्याचे दिसून येते. माजी केंद्रीय मनत्री व खासदार प्रफुल पटेल यांचे नेतृत्वात संपूर्ण तालुक्यात विकासाची गंगा आणून नगरपंचायतमध्ये विकासाची भूमिका राष्ट्रवादीने ठेवली आहे.तालुका शिवसेनेची बाजू सध्या नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेले माजी जि.प. अध्यक्ष अ‍ॅड.वसंता एंचिलवार यांनी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करून प्रतिष्ठा पणाला लावली. नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक असल्याने विकासाची संधी मिळावी म्हणून अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने निवडणुकीत सहभाग घेतला. वजनदार नेत्यांनी सभा घेवून प्रत्येक प्रभाग पिंजून काढला. मात्र नगरविकास आघाडीच्या उमेदवारांनी विकास कामांचा घोषणापत्र काढून मतदारांना आपली बाजू मांडून प्रचाराला चांगलाच वेग घेतला. केंद्रीय माजी मंत्री व खासदार प्रफुल पटेल, खासदार नाना पटोले, राज्यमंत्री शाम बावणकुळे, आमदार बाळा काशीवार यांनी प्रत्येक प्रभागात सभा घेऊन भाजपाला निवडून देण्याचे आवाहन केले.दि. १ नोव्हेंबरला मतदार होणार असून ३० आक्टोबरला प्रचार तोफा थंडावणार आहेत. निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षांचे उमेदवार विकास कामावर भर देत असले तरी अद्याप मतदारांचा कौल गुलदस्त्यात आहे (तालुका प्रतिनिधी)