शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

कटकवार विद्यालयात पक्षी व निसर्ग अभ्यास शिबिर

By admin | Updated: May 15, 2016 00:22 IST

येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय हरित सेनेतंर्गत असलेल्या ...

उपक्रम शाळेचा : १६ वर्षांपासून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील एकमेव निसर्ग शिबिरसाकोली : येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय हरित सेनेतंर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबचे लागोपाठ १६ व्या वर्षी १० दिवसीय पक्षी निरीक्षण व निसर्ग अभ्यास शिबिराचे आयोजन ३० एप्रिल ते १० मे या काळात करण्यात आले.ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा. अशोक गायधने यांनी सहभागी शिबिरार्थींना दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी ७ ते ११ या वेळात निसर्गभ्रमंती करवून त्याद्वारे त्यांना वेगवेगळ्या पक्ष्यांची ओळख, त्यांचे इंग्रजी-मराठी नावे, नर-माती फरक, त्यांचे अधिवास व सवयी याबद्दल माहिती, विविध प्रकारचे फुलपाखरे, किटक, सरपटणारे प्राणी, सापांची ओळख, विषारी, बिनविषारी सर्पसृष्टी, वनस्पती, फुले, बीज संकलन, ग्रह, तारे, नक्षत्र, तारका, आकाशगंगा यांचे ओळख तसेच टाकावू वस्तुपासून घरटे, पाणपोई व फिडर बॉटल पक्ष्यांसाठी कसे तयार करावे याचे मार्गदर्शन या शिबिरात देण्यात आले. तसेच दुर्बिन व पुस्तकाद्वारे पक्ष्यांची ओळख करण्यात आली.प्रथम दिवशी शिबिरार्थींना शालेय परिसर व तलाव परिसरात निसर्ग भ्रमंती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी नर्सरी पहाडीवर ट्रेफिंग करून शिबिरार्थीनी अ‍ॅडव्हेन्चरचा अनुभव घेतला. चौथ्या दिवशी गडकुंभली पहाडी व तलाव या ठिकाणी निसर्गनिरीक्षणाचा आनंद घेतला. पाचव्या दिवशी शिवनीबांध तलाव, मस्त्यकेंद्र, सामाजिक वनीकरण रोपवाटीकेला भेट देण्यात येवून विविध उपक्रमाची माहिती घेण्यात आली. सहाव्या दिवशी कृषी विज्ञान केंद्र व कृषी चिकित्सालय या ठिकाणी भेट देऊन विविध कृषीविषयक उपक्रम, साहित्य व अवजारे त्याचबरोबर मधमाशीपालन पेट्या व त्यांचे तंत्र निसर्ग अभ्यासासोबत समजावून घेण्यात आले. सातव्या दिवशी आलेबेदर जमनापूर परिसरात ट्रेकिंग करून भिक्कुकुटीला भेट देण्यात आली. आठव्या दिवशी गिरोला देवस्थान, कायनाईट खाण व जंगल परिसरात निसर्गभ्रमंती करण्यासोबत मधुकरराव हेडावू यांचे शेतातील आंबराईला भेट व कुंभली येथील दुर्गाबाई डोह परिसराला भेट देण्यात येवून नदीपरिसरात व डोहपरिसरात निसर्ग भ्रमंती करण्यात आली. नवव्या दिवशी रावणवाडी परिसर व देवस्थान परिसरात भ्रमंती करण्यात जैवविविधतेचा अभ्यास करण्यात आला. दहाव्या दिवशी निसर्ग पहाडीवरील विश्रामगृहात समारोप कार्यक्रम घेण्यात आला. आदित्य शहारे, युवराज बोबडे, आचल डोंगरवार, चिराग कनोजे, आदित्य डोंगरवार, कुणाल भैसारे यांना उत्कृष्ट निसर्ग शिबिरार्थी म्हणून गौरविण्यात येवून त्यांना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.निसर्ग शिबिर सहभागी प्रमाणपत्र लोकेश भजे, दर्शन कोटांगले, रितीक शोरी, हृषीकेश कोचे, आर्यन टेंभुर्णे, हर्षा लंजे, शानिद पठाण, यश भजे व पवन रामटेके, सुमेध बोरकर, आदित्य शहारे, युवराज बोबडे, आचल डोंगरवार, चिराग कनोजे, आदित्य डोंगरवार, कुणाल भैसारे, केतकी रामटेके यांना देण्यात येवून प्रत्येकांना निसर्ग पुस्तिका भेट देण्यात आली. १० दिवसीय शिबिराला यशस्वी करण्याकरिता प्राचार्य प्रकाश मस्के, मनीषा काशिवार, पुष्पा बोरकर, विठ्ठल सुकारे, डी.बी. उईके, बी.एस. लंजे, बी.एन. मांदाडे, सेवक कापगते, अनुराधा रणदिवे, शिक्षिका गेडाम, के.पी. बिसेन, संजय पारधी, जागेश्वर तिडके, विनोद तिडके, शुभम कोल, बाळकृष्ण मेश्राम, मंगेश चांगले यांनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)