लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच जमिनीवर आले आहेत. यात बागायतदार मात्र मोठ्या संकटात आला आहे. वाढत्या महागाईच्या अंदाजाने भाजीपाल्याला मिळणारा १० रुपयाच्या आतील दर परवडणारा नाही. बुधवारी बीटीबी येथे वांगे ६ ते ९ पर्यंत दराने विकला. इतरही भाज्यांचे दर उत्तरले. गृहिणींना मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे.
दिवाळी ते दसरा या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात भाजीपाल्याला चांगले दर होते. आवक कमी व मागणी बऱ्यापैकी असल्याने जिल्ह्यातील भाजी उत्पादकांना बऱ्यापैकी नफा मिळाला. मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरू झाली. पुढे जानेवारी मध्यापर्यंत दर कमीच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हाभरातील आठवडी बाजारातही भाजीपाल्याचे दर जमिनीवर आले आहेत.
राज्यातून भाजीपाल्याची मागणी वाढेपर्यंत जिल्ह्यात दर वाढणार नसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राज्यात व शेजारील राज्यात भंडारा जिल्ह्यातून अर्ध्याच्या वर भाजीपाला निर्यात होत आहे. मात्र यात जोपर्यंत वाढ होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना अधिक दर मिळणार नाही.
ड्रिप मल्चिंगचा भाजीपाला अधिक उत्पन्न देतोसुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाल्याची शेती फायद्याची ठरते. द्वीप व मल्चिंगचा वापर करून बागायती केली तर उत्पादनाचा कालावधी व गुणवत्ता उत्कृष्ट असते. किमान सहा महिने पर्यंत ड्रीप मल्चिंगचा वांगा उत्पादन देतो. त्यामुळे मार्च ते मे पर्यंत अधिक दर मिळतो.
अशी आहेत प्रति किलो भाजीपाल्याचे दर... वांगी ६-१०१, टमाटर ३५०₹ कॅरेट, मिरची २०१, वालफल्ली ३०१, तुरीच्या शेंगा ३५१, कारले ४५-५०₹, भेंडी ३०₹, कोथिंबीर ३०१, मेथी ४०₹, राजगिरा भाजी २०१, चवळी भाजी २५१, फुलकोबी १०१, पत्ता कोबी १२१
वांग्याचे विविध रंग ग्राहकांना करता आकर्षक...होय, भाजीपाल्यात सुद्धा रंग ग्राहकांना आकर्षित करतो. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात पांढरा वांगा सुपरिचित आहे. इतर वांग्यापेक्षा त्याला दुप्पट भाव असतो. गुलाबी, हिरवा, पांढरा, राखडी, काळी भटई अशा विविध रंगाच्या वांग्यांना ग्राहक आवडीनुसार खरेदी करतो.
"गुणवत्तापूर्ण भाजीपाल्याला निर्यातीकरिता मागणी आहे. सर्वसाधारण दर्जाच्या भाज्यांपेक्षा गुणवत्तापूर्ण भाजीपाल्याला दर अधिकच मिळतो. शेतकऱ्यांनी ड्रिप मल्चिंगचा आधार घेत बागायती शेती साधावी. जेणेकरून उत्पादन वाढीला मदत शक्य आहे. पुढच्या महिन्यात भाजीपाल्याच्या दरात सुधारणा शक्य आहे." - बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी, भंडारा