शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या दिवशी तीन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू; गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 14:54 IST

लाखांदूर तालुक्याच्या पुयार (चारभट्टी) जंगल तलावातील घटना 

लाखांदूर(भंडारा):दिवाळी सणाच्या मुहूर्तावर परंपरेनुसार शेळ्या धुण्यासाठी तलावावर गेलेल्या तीन सख्ख्या भावांचा एकमेकांना वाचवताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील पुयार (चारभट्टी) जंगलातील तलावात शनिवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घडली. 

मधुकर नीलकंठ मेश्राम (45), सुधाकर नीलकंठ मेश्राम (43) व प्रदीप नीलकंठ मेश्राम (39) रा.पुयार अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी सकाळी ही तीन भावंडं आणि तुषार मधुकर मेश्राम (13) असे चार जण 100 शेळ्या मेंढ्यांना घेऊन धुण्यासाठी जंगलातील तलावावर गेले होते. प्रथम मधुकर हा काही शेळ्या मेंढ्यांसोबत तलावातील पाण्यात उतरला. मात्र तो पाण्यात बुडत असल्याचे सुधाकर नामक भावाला दिसले. त्याने भावाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र तोदेखील बुडताना दिसल्याने तिसरा भाऊ प्रदीपने पाण्यात उडी घेतली. तिघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एकमेकांना वाचवताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.दरम्यान यावेळी घटनास्थळावर हजर तुषारने मोबाइलवरुन ही माहिती कुटुंबियांना माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेती. गावातीलच काही नागरिकांच्या मदतीने तिन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच सहाय्यक पोलिस निरिक्षक चहांदे यांच्यासह पोलिस नाइक दुर्योधन वकेकार, पोलिस अंमलदार संदीप रोकडे, अनिल साबळे, दशरथ सतिबावने, हुसेन नखाते आदींनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतले.दिवाळीच्या दिवशीच गावातील एका गरीब कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण पुयार गावात शोककळा पसरली आहे.