शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर बाजार समिती निवडणुकीत १४७ नामांकन मागे

By युवराज गोमास | Updated: April 20, 2023 18:17 IST

काँग्रेस समर्थित पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित पॅनल मैदानात

भंडारा : जिल्ह्यात भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर बाजार समितीच्या निवडणुकीत नामाकंन मागे घेण्याच्या (२० एप्रिल) शेवटच्या दिवशी १४७ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. यामुळे चारही बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस समर्थीत पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना शिंदे गट समर्थीत पॅनल निवडणुकीच्या मैदानात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर बाजार समितीच्या निवडणुकीत प्रत्येकी १८ संचालकांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या दबावात चारही बाजार समित्यांमध्ये एकूण १४७ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून काँग्रेस समर्थीत पॅनल व राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे.

भंडारा बाजार समितीत एकूण ७६ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६५ वैध ठरले. तर शेवटच्या दिवशी २९ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. नाामांकन मागे घेतलेल्यांमध्ये सेवा सहकारी संस्था गटातून १८ उमेदवारांनी, ग्रामपंचायत गटातून ७, अडत्या-व्यापारी गटातून ३ तर हमाल-मापारी गटातून एका उमेदवाराचा समावेश आहे. ३६ उमेदवार शिल्लक राहिल्याने काँग्रेस समर्थीत शेतकरी सहकार पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित शेतकरी एकता पॅनलमध्ये मुकाबला रंगणार आहे.

पवनी कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ संचालक पदासाठी ८९ उमेदवार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८० वैध ठरले. शेवटच्या दिवशी ४३ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. ३७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. येथे काँग्रेस समर्थीत पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे. लाखनी बाजार समितीत १८ संचालक पदासाठी ९२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८९ वैध ठरले. शेवटच्या दिवशी ५० उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. ३९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. येथे काँग्रेस समर्थीत पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित पॅनलमध्ये मुख्य मुकाबल होणार आहे.

लाखांदूर बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ६२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ५७ वैध ठरले. शेवटच्या दिवशी २५ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. ३२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. येथेही काँग्रेस समर्थीत पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्डbhandara-acभंडारा