शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा - गोंदिया जिल्ह्यांसाठी पुन्हा आला प्राणवायू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.  रुग्णांचे जीव  धोक्यात आले होते. हीच बाब लक्षात घेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली.

ठळक मुद्देप्रत्येकी १० टन लिक्विड ऑक्सिजन : प्रफुल पटेल यांच्याकडून मदतकार्य सुरुच

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावू नये, रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल  हे सातत्याने प्रयत्नरत आहेत. गेल्या दोन दिवसात त्यांनी भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांना लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करुन दिला आहे. त्यानंतर शनिवारी पुन्हा या दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १० टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करुन दिला आहे. ऑक्सिजन घेऊन दोन टँकर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामुळे ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे.भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.  रुग्णांचे जीव  धोक्यात आले होते. हीच बाब लक्षात घेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली. तसेच दोन्ही जिल्ह्यांसाठी नियमित ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यास सांगितलेे होते. त्यानंतर चार-पाच दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १० टनचे दोन ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करुन देण्यात आले. त्यानंतर शनिवारी नागपूर येथून लिक्विड ऑक़्सिजन घेऊन दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी एक-एक टँकर दाखल झाला. गोंदिया येथे श्याम ट्रेडर्सकडे टँकर क्रमांक (एमएच ४० एन ५२४०) तर भंडारा येथील सनफ्लॅग येथे टँकर क्रमांक (एमएच ४०, ७०३२) दाखल झाले आहेत. त्यामुळे ऑक्सिजन टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे. दोन्ही जिल्ह्यात निर्माण झालेल्या कोविड परिस्थितीवर खासदार प्रफुल्ल पटेल यांचे लक्ष असून, ते दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. माजी आमदार राजेंद्र जैन हे सुध्दा दोन्ही जिल्ह्यांतील परिस्थिती संदर्भातील माहिती खासदार पटेल यांना देत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन