शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
4
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
5
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
6
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
7
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
8
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
9
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
10
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
11
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
12
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
13
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
14
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
15
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
16
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
17
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
18
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
19
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
20
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

भंडारा पालिकेत भाजपचे तीन तर काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

भंडारा नगरपरिषदेच्या उर्वरित वर्षभराचा कालावधीसाठी विषय समिती सभापतीची निवड करण्यात आली. नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाणीपुरवठा व जलनिस्सार समिती सभापती पदी भुनेश्वरी मनोज बोरकर, महिला बालकल्याण सभापतीपदी साधना संतोष त्रिवेदी, स्वच्छता वैधक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी ज्योती हरिष मोगरे तर उपसभापती आशा हरिश्चंद्र उईके यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसर्वांची अविरोध निवड : नगराध्यक्षांनी घेतला पुढाकार

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नगर परिषदेच्या विविध विषय समिती सभापती निवडीसाठी शनिवारी विशेष सभा घेण्यात आली. विशेष म्हणजे या सभेत निवडणूक न होता सर्व सभापतींची निवड बिनविरोध झाली आहे. पाच पैकी तीन विषय समित्यांवर भाजपचे तर उर्वरित दोन समित्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका सदस्याची सभापतीपदी निवड झाली आहे.भंडारा नगरपरिषदेच्या उर्वरित वर्षभराचा कालावधीसाठी विषय समिती सभापतीची निवड करण्यात आली. नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाणीपुरवठा व जलनिस्सार समिती सभापती पदी भुनेश्वरी मनोज बोरकर, महिला बालकल्याण सभापतीपदी साधना संतोष त्रिवेदी, स्वच्छता वैधक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी ज्योती हरिष मोगरे तर उपसभापती आशा हरिश्चंद्र उईके यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. शिक्षण समिती सभापतिपदी राष्ट्रवादीच्या अश्विनी नरेंद्र बुरडे, नियोजन आणि विकास समिती सभापती पदी काँग्रेसचे शमीम शेख यांची वर्णी लागली आहे.कार्यकाळ संपायला शेवटचे वर्ष असल्याने विकास कामांमध्ये अडथळे न येता ते सुरळीत पडावेत या विकासाच्या दृष्टीकोनातून नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न केला. प्रत्येक पदाधिकाऱ्याने मिळालेल्या पदाकडे संधी म्हणून पाहत काम करावे, असे आवाहन करीत नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सभेला पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड तर सहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी काम पाहिले.

स्थायी समिती गठीतस्थायी समिती सदस्य म्हणून संजय कुंभलकर, आशू गोंडाने आणि विनयमोहन पशिने यांची वर्णी लागली आहे. पुढील काही दिवसात उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा