शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानात भंडारा नगरपरिषदेचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

स्वच्छतेतून समृद्धीकडे असा मंत्र देत संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. भंडारा नगरपरिषदही या अभियानात सहभागी झाली आहे. ही स्पर्धा तब्बल सहा हजार गुणांची असून विविध उपक्रमांवर गुण दिले जाणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची चमू प्रत्यक्ष पाहणीही करीत आहे. भंडारा नगरपरिषदेने या उपक्रमात भाग घेत स्वच्छतेसाठी विविध उपाय योजले जात आहेत.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०२० : नागरिकांच्या प्रतिसादाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील विविध शहरे सहभागी झाले असून त्यात भंडारा नगरपरिषदेचाही समावेश आहे. सध्या या अभियानांतर्गत शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरु असून अ‍ॅपद्वारे होणाऱ्या या सर्वेक्षणाला नागरिकांच्या प्रतिसादाची गरज आहे.स्वच्छतेतून समृद्धीकडे असा मंत्र देत संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. भंडारा नगरपरिषदही या अभियानात सहभागी झाली आहे. ही स्पर्धा तब्बल सहा हजार गुणांची असून विविध उपक्रमांवर गुण दिले जाणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची चमू प्रत्यक्ष पाहणीही करीत आहे. भंडारा नगरपरिषदेने या उपक्रमात भाग घेत स्वच्छतेसाठी विविध उपाय योजले जात आहेत. मात्र या अभियानाला यशस्वी करण्यासाठी आणि स्पर्धेत पुरस्कार मिळविण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.नगरपरिषदेने केलेल्या स्वच्छताविषयक कामांबाबद नागरिकांचा प्रतिसाद या स्पर्धेसाठी अतिशय महत्वाचा आहे. या स्पर्धेत प्रतिसादाला ४०० गुण दिले जाणार आहे. अ‍ॅपद्वारे आठ प्रश्नांची उत्तरे नागरिकांना द्यावयाची आहे. स्वच्छतेवर आधारित असलेल्या प्रश्नांना १ ते १० क्रमांकात गुण द्यावयाचे आहे. शहराच्या लोकसंख्येच्या १५ टक्के नागरिकांचा या स्पर्धेसाठी सहभाग हवा आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी त्यासाठी नागरिकांत जनजागृती करीत आहेत.नगरपरिषदेच्या वतीने त्यासाठी जनजागृती केली जात आहे. अ‍ॅप आणि संकेतस्थळावरून नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरु आहे. नागरिकांनी ३१ जानेवारीपर्यंत अ‍ॅप अथवा पोर्टलवर आपला अभिप्राय नोंदवावा. यासाठी नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी शहरात फिरून नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.-ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान