शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-गोंदियात फेरमतदानातील सर्वच मशिन्स ‘आॅल इज वेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:16 IST

नंदू परसावारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी २,१४९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु सकाळपासूनच बहुतांश मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प पडली होती. दरम्यान, मंगळवारला निवडणूक आयोगाने ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज सुरू असलेल्या मतदान केंद्रातील एकाही ...

ठळक मुद्देएकाही ईव्हीएममध्ये बिघाड नाही

नंदू परसावारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी २,१४९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु सकाळपासूनच बहुतांश मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प पडली होती. दरम्यान, मंगळवारला निवडणूक आयोगाने ४९ मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज सुरू असलेल्या मतदान केंद्रातील एकाही ईव्हीएमध्ये बिघाड आलेला नाही. सर्वच मशिनस आॅल इज वेल असून फेरमतदान सुरू आहे. आज बुधवारला एकाही ईव्हीएममध्ये बिघाड नाही आणि सोमवारला शेकडो ईव्हीएममध्ये बिघाड का आला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.या पोटनिवडणुकीसाठी गुजरात राज्यातील सुरत येथून ईव्हीएम मागविण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी यावर आक्षेप घेतला होता. कोणत्याही निवडणुकीसाठी जेवढ्या मशिन्सची गरज असते त्यापैकी १० टक्के मशिनची रॅण्डम पद्धतीने तपासणी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यामुळे या निदेर्शांनुसार ईव्हीएमची तपासणी करण्याची मागणी खा.प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. परंतु या ईव्हीएमची तपासणी करण्यात आली नव्हती. त्यानंतर मतदानाच्या दिवशी या ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडाचा प्रकार समोर आला.त्यानंतर फेरमतदान होण्याची शक्यता असल्यामुळे निवडणूक विभागाने ईव्हीएमची मागणी केली असता आयोगाने महाराष्ट्रातील सांगली व मध्यप्रदेशातील कांकेर येथून ईव्हीएम पाठविले आहे. हेच ईव्हीएम आज बुधवारला ४९ मतदान केंद्रावर फेरमतदानासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापूर्वी गुजरातहून आणलेल्या ईव्हीएम मुख्यालयात जमा करून ठेवलेल्या आहेत. दरम्यान, नव्याने रूजू झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कादंबरी बलकवडे या संपूर्ण मतदान केंद्रांवर लक्ष ठेऊन आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक