शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 13:52 IST

एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. भंडारा जिल्ह्यातील चर्चित प्रीती बारिया खून प्रकरणी त्यांनी हा निकाल दिला आहे.

ठळक मुद्देप्रीती बारिया खून प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. भंडारा जिल्ह्यातील चर्चित प्रीती बारिया खून प्रकरणी त्यांनी हा निकाल दिला आहे. अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत अशी या दोन आरोपींची नावे आहेत.३० जुलै २०१५ रोजी या दोघांनी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रविंद्र शिंदे यांच्या घरी त्यांची मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीला कायमचे अपंगत्व आले आहे. त्या

च रात्री या दोघांनी तकिया वॉर्ड येथील रुपेश बारिया यांच्याही घरी एसी दुरुस्तीच्या मिषाने प्रवेश केला. घरात असलेल्या त्यांच्या पत्नी प्रीती बारिया (३०) यांच्या डोक्यावर हातोडीने वार करून त्यांना ठार केले. त्यांचा मुलगा भव्य (९) हा या ठिकाणी आला असता त्याच्याही डोक्यावर जोरदार वार केल्याने त्यालाही कायमचे अपंगत्व आले आहे.जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी दोन्ही आरोपींना शनिवारी दुपारी १ वाजता शिक्षा सुनावली. यात अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांना भादंवि ३०७ कलमान्वये फाशीची शिक्षा ठोठावली आहे.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक करून आरोपींविरूद्ध भादंवि ३०२, ३०७, ३९७, ४५२ कलमान्वये गुन्हे नोंदविले होते. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी शनिवारला झाली. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांच्या न्यायालयात २६ साक्षदर तपासले. दोष सिद्ध झाल्यामुळे शिक्षा सुनावण्यात आली.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा