शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

भंडारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

By admin | Updated: August 24, 2015 00:49 IST

येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्हा पोलीस पावसाळी क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.

भंडारा : येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्हा पोलीस पावसाळी क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा समारोप कार्यक्रम रणजी खेळाडू हेमंत वसू यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी विविध संघातील खेळाडूंनी पथसंचालन करून मानवंदना दिली. पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी सांगून खेळाडूंना मार्गदर्शन केले.भंडारा जिल्हा पोलीस दलातील उपविभाग भंडारा, पवनी, साकोली, तुमसर तसेच पोलीस मुख्यालय भंडारा आदी चमूमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. झालेल्या स्पर्धांमध्ये विजेत्या खेळाडूंना हेमंत वसू व पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. जनरल चॅम्पियनशिपचा मानकरी पोलीस मुख्यालय भंडारा संघ ठरला. बेस्ट अ‍ॅथलेटीक पुरुषांमध्ये राहुल राऊतू व महिलांमध्ये जयश्री उपरीकर यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, कबड्डी, खोखो, गोळाफेक, भालाफेक आदी खेळांमध्ये प्रथम आलेल्या विजयी चमूंना तसेच प्रथम आलेल्या महिला व पुरुष खेळाडूंना सुद्धा पारितोषिके देण्यात आली. पोलिसांच्या कुटुंबियांकरिता विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. हेमंत वसू यांनी ज्या खेळाडूंना विजय संपादन करता आले नाही. त्यांनी येणाऱ्या स्पर्धामध्ये कठोर परिश्रम घेऊन विजय संपादन करावा, असे मार्गदर्शन केले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी खेळाडूंनी येणाऱ्या स्पर्धामध्ये जास्तीत जास्त पारितोषिके जिंकून भंडारा जिल्हा पोलीस दलाचे नाव उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) पी.पी. धरमशी, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा मारोती शेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर, प्रकाश बुरडे, पोलीस निरीक्षक कोलवाडकर, अशोक लोळे, धात्रक, जगदाळे, तेंदुलकर, चौधरी तसेच सर्व शाखेचे पो.स्टे. चे पोलीस अधिकारी, कर्मचारी, कवायद निर्देशक, पंच व अतिथी उपस्थित होते. संचालन आरती देशपांडे व मपोशि योगिनी नाकतोडे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)