शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात आमदाराने केली कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 10:38 IST

आमदार चरण वाघमारे यांनी फोन करून त्या कर्मचाऱ्याला स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयात बोलावले आणि त्यांच्या सह २० ते २५ कार्यकर्त्यांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री तुमसर येथे घडली.

ठळक मुद्देतुमसर येथील घटना चरण वाघमारेंसह कार्यकर्त्यांनी बदडले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिवी दिल्याच्या कारणावरून संतप्त आमदार चरण वाघमारे यांनी फोन करून त्या कर्मचाऱ्याला स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयात बोलावले आणि त्यांच्या सह २० ते २५ कार्यकर्त्यांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री तुमसर येथे घडली. आशिष राजपाल चौरे (२१) रा.विनोबा भावे नगर तुमसर असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.आ.चरण वाघमारे यांनी रविवारी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कक्षात पक्ष कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली होती. बाजार समितीत कार्यरत आशिष चौरे हा कर्मचारी कर्तव्यावर असताना, हे बाजार समितीचे कार्यालय आहे. कुण्या पक्षाचे कार्यालय नसून आमदार पदाचा दुरूपयोग करीत असल्याचे बाहेरच्या कार्यकर्त्यांजवळ बोलला.बैठक आटोपून आ.वाघमारे बाजार समितीतून स्वत:च्या जनसंपर्क कार्यालयात गेले असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी चौरे नामक कर्मचारी तुम्हाला शिवीगाळ करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे आ.वाघमारे यांनी स्वत: सायंकाळी ६.१९ वाजता चौरेला फोन करून जनसंपर्क कार्यालयात बोलावले. जास्त नेतागिरी आली का अंगात असे म्हणत शिवीगाळ करीत कार्यालयात डांबून २० ते २५ कार्यकर्त्यासह लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.जखमी आशिष चौरे याला प्रथम तुमसर उपजिल्हा रूग्णालयात आणि नंतर जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. याबाबत आशिषचे काका धनराज चौरे यांना कळताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार तुमसर पोलीस ठाण्यात केली. परंतु तुमसर पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी नकार दिला. मध्यस्थीने हे प्रकरण मिटविण्याचा सल्ला देऊन परत पाठविल्याचा आरोप चौरे यांनी पत्रपरिषदेत केला.

माझ्या कार्यालयात कुणालाही मारहाण करण्यात आली नाही. मद्यप्राशन करून कार्यालयात गोंधळ घातल्यामुळे मी पोलिसांना बोलावून त्याच्याविरूद्ध तक्रार दिली. कुणाच्या घरी, कार्यालयात जाऊन गोंधळ घालणे हा प्रकार योग्य नाही. या प्रकरणाला राजकीय रंग देऊन कुणीही विरोधाला विरोध करू नये. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.- चरण वाघमारे, आमदार तुमसर.

कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. नियमाप्रमाणे कारवाई न झाल्यास आम्ही कुटुंबांसह पोलीस ठाण्यासमोर धरणे देऊन लोकशाही पद्धतीने न्याय्य हक्कासाठी लढा देऊ.-धनराज चौरे, पीडित तरूणाचे काका, तुमसर.

टॅग्स :Crimeगुन्हा