शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील तंटामुक्त समिती अध्यक्षाने विम्यासाठी केला वाटमारीचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 15:18 IST

भंडारा जिल्ह्यात विम्याच्या रकमेसाठी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षाने वाटमारीचा बनाव केल्याचा प्रकार वरठी पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आला.

ठळक मुद्देपोलिसांमुळे बिंग फुटले पाचगावजवळ चौघांनी लुटल्याची दिली होती तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विम्याच्या रकमेसाठी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षाने वाटमारीचा बनाव केल्याचा प्रकार वरठी पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आला. पाचगाव फाट्यावर चौघांनी अडवून सोन्याचे दागिने लुटल्याची तक्रार दिली होती. मात्र पोलिसांच्या चौकशीत सदर दागिने एका बँकेत गहाण असल्याचे पुढे आले आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.मधुकर छोटेलाल पटले (४२) रा.पाचगाव तालुका मोहाडी असे बनाव करणाऱ्याचे नाव आहे. तो पाचगाव तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष आहे. वरठी येथे नेहमी मोटरसायकलने जाणे येणे करीत असतो.

सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता पाचगाव वरून वरठी येथे जात होते. त्यावेळी चार अनोळखी इसमांनी आपल्याला अडविले आणि १५ ग्रॅम सोन्याची चेन व १० ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकावून नेल्याची तक्रार वरठी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अज्ञात चार व्यक्तींविरुद्ध वाटमारीचा गुन्हा नोंदविला. मात्र पोलिसांना या प्रकरणात संशय आला. त्यांनी मधुकर पटले यांची उलट तपासणी सुरु केली. सुरुवातीला काहीही माहिती देण्यास तयार नव्हते. परंतु पोलीसी खाक्या पडताच त्याने खरी हकीकत पोलिसांना सांगितली.सोन्याची चेन आणि अंगठी १५ ते २० दिवसापूर्वी आर्थिक अडचणीमुळे भंडारातील एका बँकेत गहाण ठेवली होती. त्यावर ७७ हजार रुपये कर्ज उचलले. तसेच यापूर्वी हेच दागिने एका फायनान्स कंपनीतही गहाण ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्याचा विमा काढण्यात आला होता. एका विमा एजंटाने त्याला सांगितले की, तुझ्या सोन्याचा विमा काढला आहे. सोने चोरी गेल्याची तक्रार पोलिसात दे, तक्रारीची पावती आम्हाला दिली तर तुला एक लाख रुपये रक्कम मिळेल असे सांगितले. या विमा एजंटावर विश्वास ठेवून मधुकर पटले यांनी वाटमारीचा बनाव तयार केला  अशी कबुली वरठी पोलिसांना दिली आणि स्वत:च त्यात अडकले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात, संदीप बांते, त्रिमूर्ती लांडगे करीत आहेत.वाटमारी झाल्याची तक्रार प्राप्त होताच चार अज्ञाताविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र चौकशीत तक्रारदारानेच बनाव केल्याचे पुढे आले. प्रकरण न्यायालयात दखल केले जाईल व न्यायालयाच्या निदेर्शावरून कारवाई केली जाईल.-राजेशकुमार थोरात, पोलीस निरीक्षक वरठी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी