शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे उभ्या पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 20:14 IST

तीन अभयारण्य आणि दहा वनपरिक्षेत्रात विभागलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे वन्यप्राण्यांचे संकट वर्षानुवर्ष कायम आहे.

ठळक मुद्देभरपाईसाठी पायपीटरानडुकरांमुळे शेतकरी हैराण

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन अभयारण्य आणि दहा वनपरिक्षेत्रात विभागलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे वन्यप्राण्यांचे संकट वर्षानुवर्ष कायम आहे. उभ्या पिकात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात असून रानडुकरांमुळे तर शेतकरी हैराण झाले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा तर वन्यजीव विभागाचे कायदे आड येतात. दुसरीकडे नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागते.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच जिल्ह्यात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. बहुतांश शेतीही जंगलालगत आहे. जंगलातील रानडुक्कर, हरिण, माकड आदी प्राणी शेतात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. धानाचे पीक हे अत्यंत नाजूक असते. एकदा खाली पडले की ते उभे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. रानडुकरांचा कळप शेतात शिरला की धानाचे पट च्या पट आडवे पाडले जातात. तसेच भाजीपाला पिकात हरिणासह इतर प्राणी शिरून मोठे नुकसान करतात. तृणभक्षी प्राण्यासोबतच हिंस्त्र प्राण्यांचीही भीती कायम असते. वाघ, बिबट आदी प्राणी शेतशिवारानजीक दिसले की शेतात जायला भीती निर्माण होते. मजूर तर शेतात यायला तयार नसतात.भंडारा जिल्ह्यात नागझिरा व नवेगाव व्याघ्र प्रकल्प, कोका अभयारण्य आणि उमरेड कºहांडला अभयारण्य आहे. याठिकाणी वन्यप्राण्यांचा मुक्त अधिवास असतो. उन्हाळ्याच्या दिवसात प्राणी शेतशिवारात फिरून मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शेतकरी या वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी विविध उपाय योजतात. परंतु त्यात यश येत नाही. वन्यप्राण्यांची शिकार झाली तर शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. त्यामुळे अनेक शेतकरी पीक वाऱ्यावर सोडून शेती करताना दिसून येतात. वन्यप्राण्यांची शेतीपिकांचे नुकसान केले तर वनविभागामार्फत भरपाई दिली जाते. परंतु या भरपाईसाठी शेतकऱ्यांना महिनोंमहिने पायपीट करावी लागते. ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने अनेक शेतकरी तक्रार करण्यासही पुढे येत नाही.जिल्ह्यात १२०० चौरस किमी वनक्षेत्रभंडारा जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ३ हजार ७१६.६५ चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी १२०३.५५६ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. त्यात वन्यजीव विभागाकडे २२५.४८२ चौरस किलोमीटर तर मोहघाट रिसर्च सेंटरकडे ४.७८४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. २७७.७६७ चौरस किलोमीटरमध्ये संरक्षीत वन आणि ९९.६५४ किमीमध्ये झुडूपी जंगल आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मुक्त संचार सुरु असतो आणि हेच प्राणी शेतात शिरून नुकसान करतात.

टॅग्स :agricultureशेती