शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

भंडारा जिल्ह्यात १६४२ घरकुल पुर्णत्वास येणार

By admin | Updated: May 27, 2017 00:18 IST

अपूर्ण घरकुलांची संख्या विचारात घेवून विशेष मोहिमेद्वारे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास सचिवांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

२० मे ते १० जूनपर्यंत विशेष मोहीम : राज्यात १,५७,५१६ घरकुलांचा समावेशमोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अपूर्ण घरकुलांची संख्या विचारात घेवून विशेष मोहिमेद्वारे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याच्या ग्राम विकास सचिवांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. २० मे ते १० जून या कालावधीमध्ये अपूर्ण घरकुले पूर्ण करणेची विशेष मोहिम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती प्रकल्प संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने ३० मे पर्यंत राज्य व्यवस्थापन कक्ष संचालकांना पाठविणे आवश्यक आहे. न पाठविल्यास ही बाब ग्रामविकास सचिवांच्या निदर्शनास आणली जाणार आहे.प्रत्येक जिल्ह्यात अपूर्ण असणाऱ्या घरकुलांपैकी सर्वसाधारणपणे किमान ७५ टक्के घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. घर हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. घरकुले पूर्णत्वाकरिता शासनस्तावर गंभीर दखल घेण्यात आली असून लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळावे याकरिता ग्रामविकास मंत्रालय गंभीर आहे.भंडारा जिल्ह्यासह राज्यातील ३४ जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये ७१५०१२ घरकुल मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी केवळ ५०४९९१ घरकुले पूर्ण झाली. अपूर्ण घरकुलांची संख्या २१००२१ असून त्यांची टक्केवारी २९ इतकी आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत १५७५१६ घरकुले पूर्णत्वास येणार आहेत.भंडारा जिल्ह्यात एकूण मंजूर घरकुले ९८४५, पूर्णत्वास आलेली घरकुले ८२०३, अपूर्ण घरकुलांची संख्या १६४२ इतकी आहे. या विशेष मोहितेअंतर्गत १२३२ घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत.राज्यातील इतर जिल्ह्यात अपूर्ण घरकुलांची संख्या अहमदनगर १४१४०, अकोला ३८७८, अमरावती १२६६८, औरंगाबाद ५९३८, बीड ३५९४, बुलडाणा ४०६९, चंद्रपूर ५२००, धुळे १०६४१, गडचिरोली ९१९७, गोंदिया ९५८६, हिंगोली २५६४, जळगाव ९६०२, जालना ४६८५, कोल्हापूर २५१६, लातूर ४९२५, नागपूर १६९३, नांदेड ९८९१, नंदूरबार १६४६५, नाशिक १६९१४, उस्मानाबाद ३१४०, पालघर ५८०२, परभणी २३६७, पुणे ५२५८, रायगड ३०२८, रत्नागिरी ७८५, सांगली २९९८, सातारा २७७३, सिंधुदुर्ग २२९, सोलापूर ७५७९, ठाणे १४०५, वर्धा १२०१, नाशिक ६१५९, यवतमाळ १७४८९ अशी संख्या आहे. अपूर्ण घरकुलांची यादी, त्यांची कारणे, लाभार्थ्यांची रद्द झालेली घरकुले, काम सुरू न झालेले घरकुले यांची सविस्तर माहिती विविध नमुन्यातील अर्जात शासनाला सादर करावयाची आहे, असे निर्देश राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक भारत शेंडगे यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तशा आशयाचे पत्र संचालक शेंडगे यांनी पाठविले आहे.