शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रा आडवा आल्याने कार उलटली; विद्यार्थी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 12:28 IST

लाखांदूर तालुक्याच्या अंतरगावची घटना

लाखांदूर (भंडारा) : अचानक आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचविताना विद्यार्थ्यांना शाळेत सोडून देणारी कार उलटली. अपघात येवढा भीषण होता की, कारचे चारही चाके वर झाली. मात्र सुदैवाने या कारमध्ये प्रवास करणाऱ्या कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. हा अपघात लाखांदूर तालुक्याच्या अंतरगाव येथे शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडला.लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील एका खाजगी शाळेत शिक्षण घेतात.  नियमितपणे विद्यार्थी आपल्या गावावरून लाखांदूर येथे बस व खाजगी वाहनाने येतात. विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे वाहन लाखांदूर येथून  विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहोचविते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने व एसटी बंद असल्याने एका पालक गावातील विद्यार्थ्यांना कारने (क्रमांक एम. एच. ३६ ए जी ४५९८) भागडी येथून लाखांदूर येथे सोडून देत होते. साकोली - वडसा राज्यमार्गावरील अंतरगावजवळ कुत्रा आडवा आल्याने चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. कारचे चारही चाके वर झाली होती. हा अपघात पाहताच गावकरी धावले. त्यांनी कारमधून विद्यार्थ्यांसह चालकाला बाहेर काढले. या अपघातात एक विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाली. तिच्यावर लाखांदूर येथील एका खाजगी रुग्णालयात ऊपचार करण्यात आला. अपघातातील विद्यार्थी व चालक सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली.