शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा बाजार समिती निवडणूक! छत्री व कपबशी चिन्ह्यात होणार काट्याची लढत 

By युवराज गोमास | Updated: April 21, 2023 18:26 IST

भंडारा बाजार समितीची यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.

भंडारा: भंडारा बाजार समितीची यंदाची निवडणूक काट्याची होणार आहे. शुक्रवारी दुपारी चिन्हांचे वाटप उपनिबंधक कार्यालयात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गटाच्या शेतकरी एकता पॅनेलने छत्री, तर काँग्रेस समर्थीत पॅनेलने कपबशी चिन्हाला पसंती दर्शविली आहे. तीन अपक्ष गॅस सिलिंडर व टेबल चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गटाचे समर्थक एकमेकांविरुद्ध दंड थोपटून आहेत. २० एप्रिल रोजी २९ उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्यानंतर ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार आहेत. एकूण १८ संचालकपदांसाठी ही निवडणूक होत असून ३६ उमेदवार मैदानात असल्याने दोन गटांत युद्ध लढले जाणार आहे. काँग्रेस समर्थीत गट या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडत भाजप, शिंदे गटाशी घरोबा केला आहे. चिन्हवाटपाच्या दिवशी काँग्रेस समर्थीत शेतकरी सहकार पॅोलने कपबशी चिन्हाची मागणी केली. राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गट समर्थीत शेतकरी एकता पॅनेलने छत्री चिन्हाला पसंती दर्शविली. सहकारी संस्था गटात सर्वाधिक चुरशसेवा सहकारी संस्थांच्या मतदारसंघात सर्वाधिक २२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यापैकी सर्वसाधारण गटात १४ उमेदवार मैदानात आहेत. सेवा सहकारी संस्था महिला मतदारसंघात चार, तर इतर मागासवर्गीय मतदारसंघात दोन उमेदवार नशीब आजमावीत आहेत. निरधीसूचीत जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती गटात दोन उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामीण भागात या गटातील मतदारांची संख्या अधिक असल्याने उमेदवारांना गावागावांत प्रचाराला जावे लागणार आहे.

ग्रामपंचायत व जाती-जमाती मतदारसंघग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात एकूण चार उमेदवार आहेत. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात दोन उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात दोन उमेदवार आहेत.

अडते, व्यापारी व हमाल, मापारी मतदारसंघअडते, व्यापारी मतदारसंघात कपबशी चिन्हावरील दोन, तर टेबल व गॅस सिलिंडर चिन्हावरील प्रत्येकी एक याप्रमाणे दोन उमेदवार निवडणूक लढत आहेत. या गटात छत्री पॅनेलचे उमेदवार नाहीत. हमाल, मापारी मतदारसंघात कपबशी व गॅस सिलिंडर चिन्हावरील दोन उमेदवार मैदानात असून, येथेही छत्री चिन्ह गायब आहे.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा