शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा; ६९ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 15:12 IST

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ६९ कोटी ५५ लाख ९२ हजार रूपयांची पाणी पुरवठा योजनेच्या प्रारूपाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तांत्रिक मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देसहा जलकुंभातून होणार शहराला पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बारमाही वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरात इंग्रजकालीन पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे शहरात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ६९ कोटी ५५ लाख ९२ हजार रूपयांची पाणी पुरवठा योजनेच्या प्रारूपाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. आता नगर परिषदेने प्रशासकीय मान्यतेसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे पुढच्यावर्षी शहरवासियांना नियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

असा आहे मंजुरी आदेशमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता वी.बी. जगतारे यांनी जारी केलेल्या तांत्रिक मंजुरी आदेशानुसार ६९ कोटी ५५ लाख ९२ हजार रूपयांची पाणी पुरवठा योजना सुरू करण्यापूर्वी जलकुंभाची जागा निश्चित करणे गरजेचे असून भूसंपादन केल्यानंतर कामांना प्रारंभ होईल.

शहराला मिळणार पाणीसद्यस्थितीत पाणी पुरवठा योजनेची क्षमता ९ एमएलटी इतकी आहे. बस आगारजवळ असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून हुतात्मा स्मारक व कारागृह परिसरातील दोन जलकुंभातून शहरात पाणी पुरवठा होत होता. परंतु आता प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेची क्षमता २५ एमएलटी राहणार असून नवीन पाईपलाईन टाकण्यात येईल. शहराचे सहा झोनमध्ये वर्गिकरण करून आणखी चार जलकुंभ बनविण्यात येणार आहेत. हुतात्मा स्मारक परिसरात ५.९० लाख लिटर, भय्याजी नगरात ७.५० लाख लिटर, एमएसईबी कॉलनीत ४.५ लाख लिटर आणि पटवारी भवन परिसरात १२.२० लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ बनविण्याची योजना असून ही योजना अडीच वर्षात पूर्ण होईल.

पाणी पुरवठा होता ज्वलंत मुद्दावैनगंगा नदी काठावर भंडारा शहर वसले असले तरी पाणी टंचाईचा मुद्दा गंभीर बनला होता. पाणी पुरवठ्याच्या नावावर आजवर कोट्यवधीचा निधी खर्च करण्यात येत होता. भूमिगत चेतन बंधारा बांधकामासाठी कर्ज घेण्यात आले होते. त्यानंतरही पाणी टंचाईचा प्रश्न मिटला नाही. सन २०११ मध्ये पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला. परंतु काम समोर सरकले नाही. सन २०१७ मध्ये नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. फेब्रुवारी महिन्यात नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समारोहात आले असता त्यांनी पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीची घोषणा केली. तांत्रिक मंजुरी मिळाली आता प्रशासकीय मंजुरीची प्रतिक्षा आहे.

भंडारा शहरात पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार डॉ.परिणय फुके, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मंजूर होऊ शकली. आता लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. भंडारा शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असून प्रत्येक घरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- सुनिल मेंढे,नगराध्यक्ष भंडारा.

टॅग्स :Waterपाणी