शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बेला ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

By admin | Updated: January 28, 2017 00:42 IST

भंडारा पंचायत समितीची दुसरी ग्रामपंचायत समिती भंडारा अंतर्गत बेला ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

भंडारा तालुक्यातील दुसरी ग्रामपंचायत : गाव विकासासाठी मिळणार पुरस्कारामुळे चालणाभंडारा : भंडारा पंचायत समितीची दुसरी ग्रामपंचायत समिती भंडारा अंतर्गत बेला ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. संपूर्ण सोयीसुविधांनी युक्त अद्ययावत इमारत, कार्यालयीन कामाचे योग्य नियोजन, ग्रामस्थांना सर्व सोयीसुविधा पुरवठा करणे आदी विविध दृष्टीकोनातून कार्यरत असलेल्या बेला ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन प्राप्त होण्याचा बहुमान मिळाला आहे. यापूर्वी पंचायत समिती भंडारा अंतर्गत ग्रामपंचायत गणेशपुरला सुद्धा आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.आयएओ मानांकनाचा दर्जा मिळविण्याकरीता बेला ग्रामपंचायतने अनेक दिवसांपासून नियोजनबद्ध कामे करून अनेक लोकभिमुख उपक्रम राबवून आपल्या कामामध्ये सातत्य ठेवले आहे. प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर केलेल्या परिश्रमाला नक्कीच यश प्राप्त होते. हे बेला ग्रामपंचायतने दाखविले आहे. यावेळी मिळालेल्या यशाबद्दल गावच्या सरपंच शारदा गायधने म्हणाल्या मिळालेले यश हे फक्त पदाधिकाऱ्यांचे किंवा सरपंचाचे वैयक्तीक नसून सर्व गावकऱ्यांनी दिलेल्या व प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे असल्याचे सांगितले आयएसओ ग्रामपंचायत करण्याचा अनुषंगाने उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, संजय गाढवे, पोलीस पाटील भिवगडे, तंमुस अध्यक्ष नागपूरे आणि विशेषत: ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थांनी एकत्रित येवून नियोजन करून प्रत्येकानेच खारीचा वाटा उचलत दिलेल्या योगदनामुळेच ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामविकास अधिकारी कृष्णकुमार नागपुरे यांनी प्रतिक्रिया देतानी म्हणाले की, मिळालेल्या यशामध्ये प्रामुख्याने सरपंच शारदा गायधने, उपसरपंच अर्चना कांबळे, संजय गाढवे, ग्रामपंचायत सर्व सदस्यगण व ग्रा.पं.चे सर्व कर्मचारी तसेच तंमुस अध्यक्ष नागपुरे, पोलीस पाटील भिवगडे व पंचायत समितीचे कुशल मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे. उपसरपंच अर्चना कांबळे यांनी याद्दल प्रतिक्रिया देताना ग्रामस्थानी कामे योग्य वेळेत कोणतीही टाळाटाळ न करता केल्यामुळेच गावकऱ्यांना उस्फूर्त प्रतिसाद व अधिकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन यामुळे बेला ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले तसेच बेला ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाल्याने सभापती प्रल्हाद भुरे, उपसभत्तपती ललीत बोंद्रे, गट विकास अधिकारी मंजुषा ठवकर, विस्तार अधिकारी बोदेले, प्रमोद हुमणे यांनी बेला ग्रामपंचायतीला वेळोवेळी मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)