शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे बनले ‘स्टाईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:58 AM

माणसाच्या हातात स्मार्ट फोन आला खरा, पण माणसं स्मार्ट झाली का? हा प्रश्न खऱ्या अर्थाने अजूनही अनुत्तरीतच आहेत. अनेक वाहनांमध्ये मोबाईलवर बोलत स्विंग स्विंग करत वेगाने चालविणे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही दुचाकी चालक नाहीतच अशी काहीशी भावना तरुणात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, अपघाताच्या संख्येत वाढ, पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माणसाच्या हातात स्मार्ट फोन आला खरा, पण माणसं स्मार्ट झाली का? हा प्रश्न खऱ्या अर्थाने अजूनही अनुत्तरीतच आहेत. अनेक वाहनांमध्ये मोबाईलवर बोलत स्विंग स्विंग करत वेगाने चालविणे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही दुचाकी चालक नाहीतच अशी काहीशी भावना तरुणात पहावयास मिळत आहे.एका तरुणाने कानात हेडफोन घालुन 'राँग साईड'ने गाडी चालवत समोरुन आलेल्या एका वृध्दाला धडक दिल्याच्या प्रकरणात तरुणाला न्यायालयाने दिलेली शिक्षा हे नुकतेच उदाहरण आहे. मात्र अशी अनेक उदाहरणे शहरात सर्रास घडतात.एकीकडे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस तारेवरची कसरत करीत आहेत. तर दुसरीकडे अल्पयीन वाहन चालकांची संख्या वरचेवर वाढत असून उनाड तरूण इतर वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावर पोलिस लगाम घालतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गरीब असो की श्रीमंत घराण्यातील तरूण वाहन चालविण्याच्या हट्ट माता पित्यांकडे करीत आहेत. वाहन चालविण्यासाठी वयोमर्यादा लक्षात घेऊन वाहन चालविण्याचा परवाना अत्यावश्यक आहे. असे असतांनाही माता पिता हट्ट पुरविण्यासाठी अल्पवयीन मुलांकडे वाहनांचा ताबा सोपवितात. अशा प्रयत्नात अनेक मुले बळी पडत असल्याच्या घटना अनेक वेळा उघडकीस आल्या आहेत. परंतु लगाम बसत नसल्याचे दिसून येते.शहरातील मुख्य रस्त्यावरून कट मारणे, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनीना पाहून हिरोगिरी करणे, दोन्ही कानात हेडफोन लावुन गाणे ऐकत कुणांशीतरी संभाषण करीत वाहन चालविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे इतर वाहन धारकांना त्याचा परिणाम भोगावा लागतच आहे. परंतु वाहन चालविणाºया अल्पवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागत आहे. याकडे पालकांना लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी यावर लगाम घालणे अत्यंत गरजचे बनले आहे. तसेच पालकांनाही आपल्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असले तरी कारवाई मात्र नगण्य आहे. यामुळे वाहनचालकांचे मनोबल उंचावले असून वाहतूक नियमांची अमंलबजावणी होत नाही.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरजमहत्वाच्या ठिकाणी वाहनधारकांवर नियंत्रण आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेºयाची नजर असणे आवश्यक आहे. यातून वाहनधारकांवर कारवाई करत अपघात आणि वाहन चालवताना मोबाईल वापर करणाºयांवर आळा बसवता येईल. त्यासाठी शहरात सीसीटी कॅमरे लावणे गरजेचे झाले आहे.कारवाई शून्यवाहन चालविताला भ्रमणध्वीवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु आजही तरूण तरूणी भ्रमणध्वनीवर संभाषण करत वाहन चालविण्याची स्टाईल करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. अशावेळी आजूबाजूंनी किंवा पाठीमागून आलेल्या वाहनांचा थांगपत्ता लागत नाही. अशावेळी वाहतूक पोलिसांनी वाहन थांबवून थातूर मातूर कारवाई करण्याऐवजी योग्य ती कारवाई केल्यास सदर प्रकार थांबवून होणाºया अपघातापासून निदान सुटका तरी होऊ शकते. परंतु पोलिस योग्य ती कारवाई करीत नसल्याने अशा मुलांचे बळ वाढत आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल