महालगाव येथील प्रकरण : गावकऱ्यांनी दिला चोपमोहाडी : दसऱ्याच्या दिवशीच्या मध्यरात्री महालगाव येथील रस्त्यावर असलेल्या घरी अंधाराचा फायदा घेऊन शयनगृहात झोपलेल्या जोडप्यांना बघणे आरोपी कैलाश यशवंत ढबाले यांना चांगलेच महागात पडले. शयनगृहात डोकावल्याचा संशय आल्याने आरोपीला बघितले. पण आरोपी पळण्याचा प्रयत्नात असताना गावकऱ्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेची तक्रार सदर महिलेने पोलीस स्टेशन मोहाडी येथे केली असून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कैलाश ढबाले मोरगाव हा दसऱ्याचा कार्यक्रम आटोपून मोरगावकडे परत येताना महालगाव येथील रस्त्यावर असलेल्या घरी थांबला. गाडी रस्त्यावर ठेवली. शयनगृहात नवीन जोडपे बघण्याची हौस झालेल्या कैलाशने खिडकी उघडली. आतील दृष्य बघत असताना घरातील एक व्यक्ती लघुशंकेसाठी बाहेर पडली. खिडकीजवळ कोणीतरी डोकावून बघत असल्याचे त्याचे लक्षात आले. त्यांनी घरी ही बाब सांगितली. गावात घरच्यांनी आरडाओरड केली. गावकरी जागे झाले. घटनास्थळावरून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना गावकऱ्यांनी धानाच्या शेतीतून त्याचा पाठलाग करून पकडले व चांगलीच अद्दल घडविली. या घटनेची तक्रार फिर्यादी महिलेने मोहाडी पोलीस स्टेशनला केला आहे. वृत्तलिहेपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. घटनेचा तपास बीट हवालदार गिऱ्हेपुंजे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
शयनगृहात डोकावणे पडले महागात
By admin | Updated: October 5, 2014 23:00 IST