शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचे सौंदर्य खुलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : निसर्गाने मुक्त हस्त उधळण केलेल्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचा विकास जलद गतीने होणार ...

ठळक मुद्देहिल स्टेशन उभारणार : विश्रामगृहाचे बांधकाम सुरु, अन्य सुविधा विकसीत करणार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : निसर्गाने मुक्त हस्त उधळण केलेल्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाचा विकास जलद गतीने होणार असून या परिसरात हिल स्टेशन साकारले जाणार आहे. विश्रामगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून अन्य विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे. यामुळे पर्यटकांचा ओघ वाढणार असून परिसरात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.जिल्ह्याचे नंदनवन म्हणून ग्रीन व्हॅली चांदपूरची ओळख आहे. या पर्यटनस्थळाच्या विकासाला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने विकासकामांसाठी २००० मध्येच मंजूरी दिली. आॅगस्ट २०१२ पर्यंत सुरळीत सुरु असताना या पर्यटनस्थळाला नंतर उतरती कळा लागली. त्यानंतर कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आली नाही. यात तीन ते चार वर्षांचा कालावधी निघून गेला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले. राज्य शासनाच्या यंत्रणेवर दबाव निर्माण करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याकडे प्रयत्न करण्यात आले. महामंडळांतर्गत पर्यटनस्थळ विकास कार्यांना गती देण्यात आली. प्रथम टप्प्यात १ कोटी ८५ लाख रुपये खर्चून विश्रामगृहाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. इतर विकास कामांनाही गती दिली जाणार आहे. त्यात चांदपूर जलाशयात नौका विहार आणि जलक्रीडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रदर्शन केंद्र, मनोरंजन पार्क, हस्तकला केंद्राची उभारणी, रोपे आदी सुविधा येथे दिली जाणार आहेत. पर्यटनस्थळ संचालनाचे अधिकार देताना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नियमांना अधिन राहून करारबद्ध करण्यात येणार आहे. या पर्यटनस्थळाच्या विकासामुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. परिसरातील अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. बेरोजगार तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या असून काही वर्षातच नंदनवन आणखी खुलणार आहे.नौकानयनाची मंजुरी आवश्यकचांदपूर जलाशयात तात्पुरत्या स्वरुपात नौकानयनाची मंजुरी देण्याची गरज आहे. याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती चांदपूर येथील मत्स्यपालन संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे यांनी सांगितले. यामुळे पर्यटक चांदपूरकडे आकर्षित होतील, तर सामाजिक कार्यकर्ते किशोर राहांगडाले म्हणाले, चांदपूर गावात देवस्थान, ऋषीमुनी आश्रम, चांदशाहवली दर्गा आहे. या संपूर्ण परिसराचा विकास केल्यास रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल. त्या दिशेने लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना आवश्यक आहेत.

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशय