शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कौशलयुक्त जिल्हा व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 22:27 IST

महाराष्ट्र शासनाने दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने राज्यातील तरुण तरुणींना कौशल्य प्रशिक्षण प्रमाणात दिले आहे.

ठळक मुद्देरणजित पाटील : मोहाडीत कौशल्य विकास रोजगार मेळावा

आॅनलाईन लोकमतभंडारा : महाराष्ट्र शासनाने दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने राज्यातील तरुण तरुणींना कौशल्य प्रशिक्षण प्रमाणात दिले आहे. जिल्ह्यामध्ये स्वयंरोजगाराला वाव असून भंडारा जिल्हा कौशलयुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, भंडारा यांच्या वतीने मोहाडी येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी हे होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मोहाडी नगराध्यक्ष स्वाती लिमजे, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक संचालक शैलेश भगत व विविध पदाधिकारी उपस्थित होते.ना.रणजित पाटील यांनी, जगातील इतर देशाच्या तुलनेत भारताकडे मानव संसाधन अधिक आहे. हे संसाधन कौशल्ययुक्त झाल्यास देश अधिक प्रगत होईल. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात प्रथमच कौशल्य विकास हे मंत्रालय सुरु केले. महाराष्ट्रात या मंत्रालयांतर्गत प्रशिक्षणाची योजना राबविली जात आहे. शिक्षणासोबतच प्रशिक्षण आवश्यक असून युवक - युवतींनी आपल्यामधील गुण व कौशल्य ओळखून त्यानुसार क्षेत्र निवडावे. केवळ नौकरीच्या मागे न धावता कौशल्याच्या बळावर स्वत:चा रोजगार स्वत: निर्माण करा, असे प्रतिपादन त्यांनी केले.शासनाचा कौशल्य प्रशिक्षणावर मोठा भर असून व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना कौशल्य प्रशिक्षणाचा विशेष अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. मोहाडी नगर पंचायतने स्वच्छतेत चांगले कार्य करावे असे सांगून पाटील म्हणाले की, मोहाडीच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा. शासन निधी देईल. मात्र हा आराखडा सर्वंकश असावा.यावेळी बोलताना आमदार चरण वाघमारे यांनी, युवकांनी केवळ नौकरीच्या मागे न धावता रोजगार करण्यावर भर द्यावा. स्वत:च्या रोजगाराच्या संधी स्वत: निर्माण कराव्यात. या मेळाव्यात नौकरीची हमी न मिळाल्याने नाराज न होता स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा घेऊन जावे असे ते म्हणाले. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७००-८०० लोकांनी रक्तदान केले असून या क्षेत्रात ‘ब्लड आॅन कॉल’ योजना यशस्वी होत आहे. हा मेळावा युवकांनी स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणारा ठरेल असे ते म्हणाले.भंडारा जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक असून यावर आधारीत जिल्ह्याच्या विकासाचे व्हीजन प्रशासनाने तयार केल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. कृषी, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग व पशुसंवर्धन हा पंचसुत्री कार्यक्रम प्रशासन राबविणार आहे. या पंचसुत्रीमधून रोजगारांच्या अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच पर्यटनाला वाव दिला जाणार असून युवकांनी या माध्यमातून रोजगारक्षम व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिवसे यांनी केले.यावेळी तारिक कुरैशी व प्रकाश बाळबुद्धे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अनुराधा पॅरामेडीकलच्या विद्यार्थिनींचा ना.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक शैलेश भगत यांनी केले. जिल्ह्यात सहा रोजगार मेळावे घेवून ग्रामीण भागातील दीड हजार विद्यार्थ्यांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात विविध कंपन्यांनी आपले स्टॉल लावले होते. या मेळाव्यास युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार चरण वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे हस्ते करण्यात आले.