मोहाडी
: लॉटरी लागलेली आहे, असा तुम्हाला कुठून दूरध्वनी आला तर आमिषाला बळी पडू नका. आमिषाला बळी पडले आणि दूरध्वनीवर विचारणार्याला मालमत्तेची माहिती दिल्यास तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. असाच प्रकार मोहाडी तालुक्यात उघडकीस आला आणि त्या इसमाने ५१ हजार रुपयांवर पाणी फेरले. त्यामुळे भविष्यात आमिषाला बळी पडू नका तुम्ही स्वत: सावध राहा आणि दुसर्यांना सावधान करा.मोहगावदेवी
येथील एका सामान्य कुटुंबातील गिरीधर सदाशिव बावणे (४५) या इसमाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचा दूरध्वनी आला. त्यामुळे तो जामखुश झाला. लॉटरीचे पैसे जमा करण्यासाठी त्याला बँकेचे खाते क्रमांक व फोटो ईमेल आयडी पाठविण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर त्याला ९२३0६४७५५९४७, ९२३0७५३१११८0 व ९२३0६६७६२९0८ अशा बाराअंकी वेगवेगळ्या दूरध्वनी क्रमांकावरून माहिती विचारण्यात येऊन लॉटरीचे २५ लाख रुपये देण्यासाठी प्रोसेसींग फी, इन्कम टॅक्सच्या नावावर पैसे मागण्यात आले. दि
. १७ मे रोजी ४६९११0११00१४६७७ या खाते क्रमांकावर ११,२00 रुपये भरण्यासाठी सांगितले. त्यानंतर दि.१९ मे रोजी ४७१६१0११000४0६२ या खाते क्रमांकावर २५ हजार रुपये भरण्यासाठी सांगितले. २0 मे रोजी या ५१0६१0११000९९१९ खाते क्रमांकावर १५,२00 रुपये भरण्यासाठी सांगितले. हे सर्व मिळून ५१ हजार ४00 रुपये बावणे यांनी जमा केले. २२ मे रोजी पुन्हा ५१ हजार रुपये भरण्यासाठी सांगण्यात आले. दरम्यान
, बावणे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने आपले मित्र कलामभाई यांना सर्व आपबिती सांगितली. त्यानंतर या प्रकाराची मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार जे.एम. गुंजवटे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)