शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कस्टमर केअर सर्च करताना व्हा सावधान; अनेकांना घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:25 IST

Bhandara : बँक खात्याची वैयक्तिक माहिती देणे धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऑनलाइन फसवणुकीतून अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात येत आहे. त्यातच गुगलची मदत घेणाऱ्यांनाही फसव्या हेल्पलाइनच्या माध्यमातून चुना लागत असल्याची बाब समोर येत आहे. तक्रार नोंद करण्यासाठी कोड स्कॅन करण्याच्या बहाण्याने बँक खाते रिकामे होत आहे. फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

देशभरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण गंभीर होत असून, त्यात भंडारादेखील गुन्हेगारांच्या जाळ्यात फसले आहेत. तरीही अनेकजण गुन्हेगारी पद्धतीबद्दल असलेल्या अज्ञानामुळे गुन्हेगारांच्या गळाला लागत आहेत. त्यामध्ये गुगलची मदत घेणाऱ्यांचाही समावेश दिसून येत आहे.

एखाद्या कंपनीचा हेल्पलाइन नंबर शोधण्यासाठी गुगलची मदत घेतली जाते; परंतु गुन्हेगारांनी अगोदरच हेल्पलाइनच्या नावाने त्यांच्या नंबरचे जाळे पेरलेले असते. त्यावर एखाद्याने तक्रारीसाठी संपर्क साधल्यास वैयक्तिक माहितीवरून बँक खाती रिकामीसुद्धा केली आहेत.

नागरिकांनो, सावध राहा; आमिषाला भुलायचे टाळा'फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियावरील आमिषाला बळी पडायचे टाळले पाहिजे. जादा परतावा, दामदुप्पट हे सापळे असू शकतात. त्यामुळे असे आमिष दिसल्यास सतर्कता बाळगतच लिंक व साईट उघडणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

उच्च शिक्षितांसोबत अल्पशिक्षितही गळालाट्रेडिंगच्या बहाण्याने, कारवाईचा धाक दाखवून आर्थिक फसवणुकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. दिवसेंदिवस उच्च शिक्षितांसोबतच अल्पशिक्षितदेखील गळाला लागत असल्याचे या घटनांवरून दिसून येते.

अशा प्रकारे झाली फसवणूक

  • ऑफरची लिंक पाठवून त्यावर माहिती जाणून एकाची फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे अशा फसव्या लिंकपासून सावध राहणे गरजेचे आहे.
  • बँकेतून अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून ओटीपी नंबर मागून खात्यातून पैसे गहाळ केल्याचीही घटना घडली आहे.
  • अधिकृत संकेतस्थळांचा हेल्पलाइन नंबर शोधण्यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरच जाऊन तिथल्या नंबरवर संपर्क साधला पाहिजे. नाहीतर आर्थिक फटका बसू शकतो.

कुठे कराल तक्रार ?ऑनलाइन फसवणूक झाली असल्यास गुन्हा स्थानिक पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांकडे वर्ग केला जातो.

२५ गुन्हे महिन्याला सरासरी घडतात घटनासायबर गुन्ह्यांच्या नोंदणीचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. पोलिस विभागाने यावर उपाय म्हणून चॅटबोट अॅप आणले असल्याने जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे.

"कुणालाही आपल्या बँक खात्याची वैयक्तिक माहिती ओटीपी, एटीएम पीन नंबर देऊ नका. आमिष देणाऱ्या लिंक असतील किंवा कोणत्याही लिंक ओपन करताना पूर्णतः शहानिशा करूनच लिंक ओपन करावी. फसवणूक झाल्यास लगेच जवळील पोलिसांना माहिती द्या."- नुरूल हसन, पोलिस अधीक्षक, भंडारा

टॅग्स :bhandara-acभंडाराfraudधोकेबाजी