शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

सावधान! स्वस्तातील गॉगल पडू शकतो महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 11:30 IST

शहरातील मार्ग तसेच महामार्गावर ठिकठिकाणी थाटलेल्या दुकानातून गॉगल विकत घेण्याचा विचार करीत असाल, तर सावधान!

ठळक मुद्देरस्ते का माल सस्ते मेंचोंखदळ ग्राहकांची ब्रँडेड गॉगल्सलाच अधिक पसंतीरस्त्यावरच दुकाने थाटल्याने ग्राहकांचा ओढा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील मार्ग तसेच महामार्गावर ठिकठिकाणी थाटलेल्या दुकानातून गॉगल विकत घेण्याचा विचार करीत असाल, तर सावधान! या नॉन ब्रँडेड गॉगल्समुळे प्रवासादरम्यान ऊन आणि धुळीपासून आपल्याला तात्पूरती सुटका मिळेल, पण याचे दूरगामी परिणाम गंभीर स्वरुपाचे आहेत. याचा वापराने डोकेदुखी, डोळ्यात जळजळ आणि अंधुक दिसणे यासारख्या व्याधींचा मोठा धोका आहे. स्वस्ताच्या नादात आपल्या डोळयांशी खेळ करण्यासारखा हा प्रकार आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी गॉगल विक्रीचा धंदा तेजीत आहे. भंडारा- नागपूर मार्गावर देखील ही दुकाने सुरु आहेत.शहराबाहेरील इतर मार्गावरही ही दुकाने आढळतात. शहराच्या चारही बाजूंनी अशा प्रकारची ३० ते ५० दुकाने असल्याची माहिती या क्षेत्रातील व्यावसायिकाने दिली. सर्वच दुकानावर गॉगल्स खरेदीकरिता ग्राहकांची गर्दी उसळलेली असते, मात्र त्याची कोठेही नोंद नसल्याने दुकानाची अचूक संख्या प्रशासनाकडे उपलब्ध नाही.एकीकडे शास्त्रोक्त पध्दतीने तयार न करण्यात आलेले स्वस्तातील गॉगल्स विकून नागरिकांचे डोळे खराब करणे, दुसरीकडे विनापरवानगी दुकाने थाटून शासनाचा कर बुडविण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत.रस्ते का माल सस्ते में ही म्हण आता गॉगलच्याही बाबतीत तंतोतंत खरी ठरत आहे. पूर्वी गॉगल किंवा चश्मा घेण्यासाठी दुकानात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दुकानामध्येही ब्रँडेडच्या तुलनेत स्वस्त असले तरी चोंखदळ ग्राहकांची ब्रँडेड गॉगल्सलाच अधिक पसंती आहे.दुकानामध्ये मिळणारे नॉन-ब्रँडेड गॉगल्स नामांकित कंपन्यांचे नसले तरी ते रस्त्यावरील गॉगल्ससारखे डोळ्यांना हानिकारक नाहीत, पंरतु ६-७ वर्षात गॉगल विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने ग्राहकांचा ओढा अधिक वाढला आहे.अत्यंत कमी किंमतीत आणि हव्या त्या स्टाईलमध्ये हे गॉगल्स मिळत असल्याने ग्राहक वर्ग त्या गॉगल्सकडे आकर्षित होत आहेत. यात फॅशन म्हणून सतत गॉगल घालणारे कॉलेज कुमार आणि मोटारसायकलवर प्रवास करणाऱ्यांचा समावेश असतो, परंतु तज्ज्ञ मंडळींच्या मते अशा गॉगल्सचा वापर अत्यंत हानिकारक असल्याचे सांगतात. पैसे वाचवण्याच्या नादात आपण सुंदर आणि नाजूक अंग असलेल्या डोळयांशीच खेळ करतोय, याबाबत ग्राहक अनभिज्ञ असतो. याचाच परिणाम म्हणून रस्त्यावरील दुकानात गर्दी होत आहे.केवळ ५० ते १०० रुपयापर्यंत रस्त्यांवर थाटलेल्या दुकानांमध्ये गॉगल्स विक्रीला उपलब्ध असतात. वेळ मारुन न्यायची म्हणून हे गॉगल्स खरेदी केले जातात.

काय आहे नेमका धोका?रस्त्यावर मिळणारे गॉगल अप्रमाणित असतात. त्याच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांबरोबरच याच्या दांड्या आणि फ्रेम ज्या ठिकाणी त्वचेला स्पर्श करते तेथे त्रास होण्याची शक्यता असते. या गॉगल्सची फिनिशिंग नीट नसल्याने याचा काचा धारदार राहतात. दांड्यावरही धारदार टोक बाहेर आलेले असते. हे टोक त्वचेला टोचल्याने इजा होण्याची शक्यता असते. यामुळे डोळयातून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांवर ताण पडणे, डोके दुखणे यासारखे विकार जडण्याची शक्यता असते.या गॉगलमध्ये वापरण्यात आलेला काच किंवा फायबर बरोबर तपासलेले नसते. यामुळे नकळत नंबर नसणाºया व्यक्तीलाही नंबरचा गॉगल घालण्याची वेळ येते. परिणामी भविष्यात त्याला नंबर लागण्याची भीती असते.अप्रमाणित गॉगल्समधून सूर्यातून निघणारे अल्ट्रा व्हायलेट किरण रोखले नाहीत यामुळे गॉगल घातला असतानाही हे सूर्यकिरण थेट डोळ्यापर्यंत पोहोचतात. अशा परिस्थितीत जास्त वेळ गॉगल डोळ्यावर राहिला तर मोतीबिंदूचा त्रास होण्याचा धोका असतो.सर्वात महत्वाचे म्हणजे हे विक्रेते कोणतीच पावती देत नाहीत. त्यामुळे गॅरंटीचा प्रश्नच येत नाही. याचा वापरामुळे इजा झाली तर विक्रेत्यांविरुध्द तक्रार करण्यासाठी कोणताच पुरावा उपलब्ध नसतो. शिवाय आपण पावती घेत नसल्यामुळे शासनाचा करही बुडवतो याची जाणीव आपल्याला नसते.

काय घ्यावी काळजीकेवळ रस्त्यावरचेच नव्हे, तर दुकानातही गॉगल घेताना त्याच्या काचा तपासून पाहणे आवश्यक आहे. रस्त्यावरील गॉगलच्या एअरबाल राहण्याची शक्यता असते. मायक्रोस्कोपमधून तो स्पष्ट दिसतो.गॉगल डोळ्यांसमारे धरुन बघितल्यास पलीकडचे दृश्य व्यवस्थित दिसायला हवे. जर ते दृश्य चित्र-विचित्र किंवा अस्पष्ट दिसत असेल तर तो गॉगल फॉल्टी आहे.गॉगल घातल्यानंतर जमिनीचा अंदाज घ्यायला हवा. जर जमीन खालीवर दिसत असेल तर तो गॉगल घेऊ नये.नंबर असणारे हव्या त्या नंबरचा गॉगल बनवून घेऊ शकतात. तसेच अशा व्यक्तिंनी सनग्लासचा वापर केला. तर तेही सोयीचे ठरु शकते.

वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचेरस्त्यावर मिळणाºया गॉगलसाठी वापरले जाणारे फायबर अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याने ते लगेच गरम होते. यामुळे सूर्यापासून निघाणाºया अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून संरक्षण तर होत नाहीच, उलट डोळ्यांना त्रासच होतो. खूप महागडे व ब्रँडेड घेणे शक्य नसले तरी किमान दुकानातुन मिळणारे साधे गॉगल घेतले पाहिजे, असे नेत्र शल्यचिकित्सक डॉ. एल.के. फेगडकर यांनी सांगितले.

स्टाईलकडे धावहायवेवर ठिकठिकाणी गॉगल्सची दुकाने थाटलेली आढळून येते. अशा ठिकाणी विक्रीकरिता उपलब्ध असलेले गॉगल्स डोळ्यांना घातक ठरत असल्याचे सिध्द होत आहे. मात्र स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांनी असे गॉगल्स खरेदी करण्यास पंसती दिली. मात्र यामुळे नेत्रविकाराचा आजार बळवतो. तसेच शासनाचा करही बुडतो.

आमचा ग्रुप गॉगल्सचा शौकीन आहे. याच्या स्टाईल दररोज दिसतात, मात्र दरवेळी महागडे ब्रँडेडचे गॉगल्स घेतले तर आमचे बजेट कोलमडते. यासाठी स्वस्तात मस्त असणारे हे रस्त्यावरचे गॉगल आम्ही पंसत करतो. वापरायचे आणि फेकून द्यायचे, असे याचे काम आहे.-हर्षल लाडे, अथांग वासनिक

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल