शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! कार्बाईड गन हिरावू शकते दृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील बहुतांश शेती जंगला लागत आहे. शेत शिवारात माकडांसह वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असतो. त्यामुळे शेतकरी हतबल झालेले असतात. अशातच काही महिन्यांपूर्वी गावात देशी जुगाड असलेली कार्बाईड गन विकायला आली. प्लास्टीक पाईप आणि त्यात विशिष्ट गोळा टाकला की निकामी इंजेक्शन सिरिंजमधुन पाणी फवारल्यानंतर मोठा आवाज होतो. त्यामुळे माकड आणि पक्षी पळून जातात. प्राण्यांना कोणताही धोका होत नाही.

ठळक मुद्देअनेकांना अंधत्व : माकड आणि पक्षी पळविण्याचे देशी जुगाड धोकादायक, मुलांना ठेवा गनपासून दूर

  ज्ञानेश्वर मुंदे   लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  पशूपक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी देशी जुगाड तंत्राने तयार केलेली कार्बाईड गन आता अनेकांची दृष्टी हिरावत आहे. माकड आणि पक्ष्यांना पळवून लावताना मोठा आवाज करणारी ही गन चालविताना झालेली चूक कायमचे अंधत्वही देत आहे. ग्रामीण भागता अनेकांच्या डोळ्याता जबर इजा झाली आहे. काही महिन्यांपुर्वी गावागावांत ही गन विकणारी मंडळी आली होती. अनेकांनी गरज म्हणून खरेदीही केली. परंतु आता या गनने अनेकांचे डोळे जायबंदी करत रुग्णालयाचा रस्ता दाखवत आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेती जंगला लागत आहे. शेत शिवारात माकडांसह वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असतो. त्यामुळे शेतकरी हतबल झालेले असतात. अशातच काही महिन्यांपूर्वी गावात देशी जुगाड असलेली कार्बाईड गन विकायला आली. प्लास्टीक पाईप आणि त्यात विशिष्ट गोळा टाकला की निकामी इंजेक्शन सिरिंजमधुन पाणी फवारल्यानंतर मोठा आवाज होतो. त्यामुळे माकड आणि पक्षी पळून जातात. प्राण्यांना कोणताही धोका होत नाही. चालवायला सहज सोपी असल्याने अनेकांनी ती खरेदी केली. ग्रामीण भागात अनेकांकडे या कार्बाईड गन दिसून येतात. मात्र आता ही कार्बाईड गन डोळ्यासाठी घातक ठरत आहे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील एक तरुण कार्बाईड गन चालविताना जखमी झाला. त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाली. त्यामुळे त्याने भंडारा येथील एका नेत्र तज्ज्ञाकडे धाव घेतली. त्यात त्या मुलाच्या काॅर्नियाला जखम झाल्याचे दिसून आले. कार्बाईड गनच्या इजेने डोळ्याची बाहुली पांढरी होऊन दिसणे अशक्य होते. शहरातील अनेक नेत्र तज्ज्ञांकडे आठवड्यातून तीन चार व्यक्ती कार्बाईड गनने जखमी झालेले येत असल्याचे दिसत आहे. अनेकदा कार्बाईड गनचा वापर प्राण्यांना हाकलण्यापेक्षा गंमत म्हणूनही अनेक जण करतात. दिवाळीच्या काळात गावात अनेकांनी कार्बाईड गनने मोठा आवाज करुन फटाके फोडण्याचा आनंदही लुटला होता. परंतु हा आनंद आता त्यांची कायमची दृष्टी हिरावत असल्याचे दिसते. ग्रामीण भागात देशी जुगाड तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक बाबी केल्या जातात. युट्युब वरील व्हीडीओ पाहूनही अनेकजण असे प्रकार करताना दिसतात. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. कार्बाईड गन विकायला आल्यानंतर आता अनेकजण तशीच गन प्लास्टीक पाईपपासून तयार करुन त्याचा वापर करीत आहेत. मात्र ते डोळ्याच्या गंभीर इजेला कारणीभूत ठरत आहे.

गावागावांमध्ये विकली जाते दीडशे, दोनशे रुपयाला गनग्रामीण भागात ही गन अतीशय लोकप्रिय असून अवघ्या दीडशे ते दोनशे रुपयात तेही दारावर मिळत असल्याने अनेकांनी ती खरेदी केली. साधारणत: सहा सात महिन्यापूर्वी काही मंडळी ही गन घेऊन विक्रीसाठी आले होते. त्यांनी प्रात्यक्षिकांसह गन दाखविल्याने अनेकांनी खरेदी केली. परंतु आता या गनचे दुष्परिणामही भोगावे लागत आहे. 

असा होतो अपघातकार्बाईड गनमध्ये विशिष्ट गोळा टाकल्यानंतर त्याला सिरिंजने पाणी फवारले जाते. परंतु अनेकदा त्यातुन आवाजच येत नाही. त्यामुळे या गनजवळ तोंड नेऊन काय झाले हे बघितले जाते आणि दुर्देवाने त्याच वेळी स्फोट होऊन प्रचंड धूर निघतो. त्या धुरामुळे डोळ्याला इजा होते. गंभीर इजा झाल्यानंतर रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु अनेकदा मोठी दुखापत असल्याने उपचार होत नाही.

गत तीन चार महिन्यांपासून डोळ्याची इजा झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता कार्बाईड गनने डोळ्याला दुखापत झाल्याचे सांगतात. यात सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. मोठी मंडळीही आहे. डोळ्याची बाहुली पांढरी झाली तर त्यावर उपचार करणे जवळजवळ अशक्य असते. काही लोकांना तर यामुळे अंधत्वही येऊ शकते. - डॉ. दीपक नवखरे, नेत्र तज्ज्ञ भंडारा.

 

टॅग्स :eye care tipsडोळ्यांची काळजी